Derek O'Brien Suspended: राज्यसभेच्या सभापतींसोबत झालेल्या वादानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन निलंबित
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन (Derek O'Brien) यांना लोकसभेच्या सुरक्षा भंगाच्या (Parliament Security Breach) घटनेवरून झालेल्या गदारोळात सभागृहाच्या अध्यक्षांशी झालेल्या बाचाबाचीनंतर गैरवर्तन केल्याबद्दल राज्यसभेतून निलंबित केले आहे.
Derek O'Brien Suspended: तृणमूल काँग्रेसचे खासदार (Trinamool Congress MP) डेरेक ओब्रायन (Derek O'Brien) यांना लोकसभेच्या सुरक्षा भंगाच्या (Parliament Security Breach) घटनेवरून झालेल्या गदारोळात सभागृहाच्या अध्यक्षांशी झालेल्या बाचाबाचीनंतर गैरवर्तन केल्याबद्दल राज्यसभेतून निलंबित केले आहे. गुरुवारी राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर तासाभरात विरोधी खासदारांनी संसदेच्या सुरक्षा भंगावर चर्चेची मागणी करत सभागृहात गोंधळ घातला. सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी खासदारांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याची मागणी करणाऱ्या 28 नोटिसा पाठवल्या.
दरम्यान, चेअरमन जगदीप धनखर यांनी नोटीस नाकारली. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तराची मागणी केली. धनखर यांनी खासदारांच्या अनियमित वर्तनचा निषेध केला. यावेळी, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी खुर्चीसमोरील भागात जाऊन आपले हात हवेत उडवले. यामुळे संतापलेल्या धनखर यांनी ओब्रायनचे नाव घेत सभागृह सोडावे असे सांगितले. (हेही वाचा -Parliament Security Breach Updates: संसद सुरक्षा भंग प्रकरणी सात कर्मचारी निलंबीत)
दरम्यान, धनखर यांनी डेरेक ओब्रायनच्या वर्तनाला अध्यक्षांचे 'अवज्ञा' आणि 'गंभीर गैरवर्तन' म्हटले. त्यानंतर, वरिष्ठ सभागृहाने ओब्रायन यांना उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. 2001 च्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी झालेल्या सुरक्षा भंगात, दोन व्यक्तींनी झिरो अवर दरम्यान सार्वजनिक गॅलरीतून लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारली आणि धुराचे नळकांडे फोडले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)