नवीन नियमांमुळे केबल-डीटीएच शुल्कात 15 टक्क्यांनी कपात

ट्रायने (TRAI) लागू केलेल्या नवीन नियमांमुळे त्याच्या प्रभाव देशभरात उत्तमरित्या होत असून प्राथमिक अहवालानुसालर केबल आणि डीटीएच ग्राहकांच्या शुल्कात 15 टक्क्यांनी कपात झाल्याचे ट्रायने म्हटले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ट्रायने (TRAI) लागू केलेल्या नवीन नियमांमुळे त्याच्या प्रभाव देशभरात उत्तमरित्या होत असून प्राथमिक अहवालानुसालर केबल आणि डीटीएच ग्राहकांच्या शुल्कात 15 टक्क्यांनी कपात झाल्याचे ट्रायने म्हटले आहे. महानगरांमध्ये 10 ते 15 टक्के कपात झाली आहे. तर ग्रामीण भागात 5 ते 10 टक्के कपात झाल्याचा दावा ट्रायकडून करण्यात आला आहे.

ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याची संधी देण्यात आली आहे. तर विरुद्ध कृती करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्या घरात एकापेक्षा अधित टीव्ही संच असल्यास त्यांना कोणत्या दराने सेवा उपलब्ध करुन द्यावी याबाबत लवकरच डीपाओ तर्फे निर्णय घेतला जाणार आहे. तर प्रीपेड सेवा धारकांनी त्यांचे पॅकेज संपेपर्यंत कोणाताही अडथळा आणू नये असे निर्देश ही देण्यात आले आहेत. (हेही वाचा-टीव्ही वाहिन्यांबाबत TRAI चे नवे नियम; 130 रुपयांत तब्बल 100 चॅनेल्स पाहायची संधी)

मात्र काही वाहिन्यांनी त्यांच्या मतानुसार तयार केलेली पॅकेजेस ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहे. त्याचसोबत सामूहिक वाहिन्याचे पॅकेज अशा पद्धतीचे पॅकेज तयार केले असून ते ग्राहकांना घेण्यास भाग पाडत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ट्राय अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी सांगितले आहे.