Coronavirus: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली; 96 जणांची कोरोनावर मात तर 27 जणांचा बळी, आरोग्यमंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर
तसेच 96 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, या जीवघेण्या विषाणुमुळे आतापर्यंत देशात 27 जणांचा बळी गेला आहे. आरोग्यमंत्रालयाकडून यांसदर्भात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
Coronavirus: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली आहे. तसेच 96 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharged) देण्यात आला आहे. परंतु, या जीवघेण्या विषाणुमुळे आतापर्यंत देशात 27 जणांचा बळी गेला आहे. आरोग्यमंत्रालयाकडून (Ministry of Health and Family Welfare) यांसदर्भात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
दरम्यान आतापर्यंत महाराष्ट्र (186), केरळ (182), तेलंगणा (66), उत्तर प्रदेश (65), कर्नाटक (76), गुजरात (58), दिल्ली (49), राजस्थान (55), हरियाणा (33), तमिळनाडू (49), पंजाब (38), पश्चिम बंगाल (18) मध्य प्रदेश (30), जम्मू-काश्मीर (31), आंध्र प्रदेश (19), अंदमान निकोबार (9), बिहार (11), चंदीगढ (8), छत्तीसगड (7) रुग्ण आढळले आहेत. (हेही वाचा - प्रियंका गांधी यांचे टेलीकॉम कंपन्यांना पत्र; लॉकडाऊन दरम्यान शहरातील विविध भागात अडकलेल्या कामगारांना महिनाभरासाठी मोफत ईनकमिंग-आउटगोईंग सुविधा द्या)
कोरोना बाधितांची एकूण आकडेवारी पाहता महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर केरळ राज्यात कोरोग्रस्तांची संख्या जास्त आहे. आज केरळमध्ये 20 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 196 वर जाऊन पोहोचला आहे. सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या आणि डॉक्टर्संच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत 96 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.