Tomato Prices Hike: पेट्रोलपेक्षा टोमॅटो महाग; 'या' शहरांत 100 रुपये प्रतिकिलोने विक्री, तुमच्या शहरातील भाव काय? टोमॅटोचे दर का वाढले? जाणून घ्या

सरकारी आकडेवारीनुसार, एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत बुधवारी दिल्ली वगळता इतर महानगरांमध्ये टोमॅटोच्या किरकोळ किमती 77 रुपये प्रति किलो झाल्या आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Tomato Prices Hike: भारतात कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून प्रत्येक व्यक्ती महागाईच्या झळा सोसत आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ केल्यानंतर आता भाजीपाल्याचे भावही महागल्याने जनतेच्या खिशावर बोजा पडत आहे. आता तर लोकांच्या घरी बनवल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये टोमॅटो (Tomato) नगण्य झाले आहेत. होय, सरकारी आकडेवारीनुसार, एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत बुधवारी दिल्ली वगळता इतर महानगरांमध्ये टोमॅटोच्या किरकोळ किमती 77 रुपये प्रति किलो झाल्या आहेत.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोलकात्यात टोमॅटोची किरकोळ किंमत 30 एप्रिल रोजी 25 रुपये प्रति किलोवरून 30 एप्रिल रोजी 77 रुपये प्रति किलो झाली. मुंबईतही किरकोळ टोमॅटोचा भाव 1 मे रोजी 36 रुपये प्रति किलोवरून 1 जून रोजी 74 रुपये किलो झाला, तर चेन्नईमध्ये 47 रुपये किलोवरून 62 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला. दिल्लीत, टोमॅटोचा किरकोळ भाव 39 रुपये प्रति किलो होता. बुधवारी पोर्ट ब्लेअर, शिलाँग, कोट्टायम, पठाणमथिट्टा या चार शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 100 रुपये किलोच्या वर गेले. (हेही वाचा - BMC On Plastic Ban: मुंबईत प्लास्टिक बंदीविरोधात BMC कडक, उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह तुरुंगात पाठवणार)

टोमॅटोचे भाव वाढण्याचे कारण काय?

आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये किरकोळ किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये टोमॅटो 50 ते 100 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. व्यापारी आणि तज्ञांनी किरकोळ किमतीत वाढ होण्याचे श्रेय आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमधून पुरवठ्यातील संभाव्य तुटवड्याला दिले आहे.

टोमॅटोची ऑल इंडिया रिटेल किंमत 77 टक्क्यांहून अधिक वाढून बुधवारी 52.30 रुपये प्रति किलो झाली. जी महिन्यापूर्वीच्या कालावधीत 29.5 रुपये प्रति किलो होती. टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून टोमॅटो गायब झाला आहे.