African Cheetahs Will Come in India: आज दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात येणार; Kuno National Park मध्ये तयारी पूर्ण

दक्षिण आफ्रिकेच्या पर्यावरण विभागातील जैवविविधतेचे उपमहासंचालक फ्लोरा म्हणाले की, भारताला आपल्या देशात चित्त्यांची संख्या वाढवायची आहे ही आनंदाची बाब आहे.

African Cheetahs Will Come in India: आज दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात येणार; Kuno National Park मध्ये तयारी पूर्ण
African Cheetahs (PC - pixabay)

African Cheetahs Will Come in India: आज 12 विशेष पाहुण्यांचे आगमन देशात होत आहे. हे पाहुणे दुसरे-तिसरे कोणी नसून दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) येणारे 12 चित्ते आहेत. हे चित्ते मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) ची शान बनणार आहेत. या प्रकल्पाशी संबंधित दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं असल्याचं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पर्यावरण विभागातील जैवविविधतेचे उपमहासंचालक फ्लोरा म्हणाले की, भारताला आपल्या देशात चित्त्यांची संख्या वाढवायची आहे ही आनंदाची बाब आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे महानिरीक्षक डॉ. अमित मल्लिक यांनी दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांशी संबंधित हा करार ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या चित्तांसाठी 10 क्वारंटाईन एन्क्लोजर बनवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा -Cheetahs Into Kuno National Park: तब्बल 70 वर्षांनंतर चित्त्यांची घरवापसी, पंतप्रधान मोदी कुनो राष्ट्रीय उद्यानात आठ बिबट्या सोडणार)

चित्त्यांची दुसरी तुकडी शनिवारी सकाळी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर हवाई दलाच्या तळावर पोहोचेल. त्यानंतर त्यांना भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने सुमारे 165 किमी अंतरावरील श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नेले जाईल. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन एनक्लोजरमध्ये ठेवण्यात येईल. चित्ता प्रकल्पाचे प्रमुख एसपी यादव यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाचे विमान आज सकाळी 10 वाजता ग्वाल्हेर विमानतळावर पोहोचेल. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, नरेंद्र सिंह तोमर आणि मुख्यमंत्री एसएस चौहान कुनो नॅशनल पार्कमध्ये उपस्थित राहतील. (हेही वाचा - Welcome Cheetah to India: नामेबियातून आणलेल्या चित्त्यांचं बारसं केल्यास कुनो नॅशनल पार्कमध्ये मोफत जंगल सफारीची संधी, भारत सरकारकडून अनोख्या स्पर्धेची घोषणा)

कुनो नॅशनल पार्कचे संचालक उत्तम शर्मा यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील चित्तांसाठी 10 क्वारंटाईन एन्क्लोजर तयार करण्यात आले आहेत. तयारी पूर्ण झाली आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये 1 महिना क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल. वन्यजीवांनी तयार केलेल्या 'भारतातील चित्ताच्या री-इंट्रोडक्शन प्लॅन'नुसार दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि इतर आफ्रिकन देशांमधून सुमारे 12-14 वन्य चित्ता (8 ते 10 नर आणि 4 ते 6 मादी) आयात केले जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात नामिबियातून 8 चित्त्यांची पहिली तुकडी सोडली होती. यामध्ये 5 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश होता. पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी गेल्या महिन्यात संसदेत माहिती दिली की, कुनोमधील सर्व 8 चित्ते आता एका मोठ्या कंपाऊंडमध्ये सोडण्यात आले आहेत. ते म्हणाले होते की, चित्तांमध्ये आरोग्याची कोणतीही गुंतागुंत आढळलेली नाही. 1952 मध्ये देशातून चित्ता नामशेष झाला आणि 70 वर्षांनंतर गेल्या वर्षी हा प्राणी भारतात आणण्यात आला आहे.