Uttar Pradesh Crime: हद्दच झाली, तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकले, हॉटेलमध्ये घडलेला थरारक CCTV कैद

हॉटेलच्या पार्किंगवरून पहिल्या मजल्यावरून फेकले

Uttar Pradesh Crime PC TWITTER

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका व्यावसायिकाच्या मुलाला हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. हॉटेलच्या पार्किंगवरून पहिल्या मजल्यावरून फेकले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. ही घटना रविवारी (२१ एप्रिल रोजी) घडली आहे. (हेही वाचा- प्रोबेशन कालावधी दरम्यान महिलेला प्रसूती रजा नाकारली जाऊ शकत नाही)

मिळालेल्या माहितीनुसार, रेडिसन हॉटेलमध्ये एक फॅमिल प्रोग्राम सुरु होता त्यावेळी ही घडलं. हॉटेलच्या पार्किंगवरून तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकले आहे. सुरुवातीला त्यांच्या वाद सुरु होता. सर्व जण दारूच्या नशेत होते. सार्थक अग्रवाल असं पीडित तरुणाचे नाव आहे. तो व्यापारी सुरक्षा मंचचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि रसायन पुरवठादार संजय अग्रवाल यांचा मुलगा आहे.

दारुच्या नशेत ते भांडण करत होते. वाद इतका वाढला की, त्यांच्यात मारामारी झाली आणि त्यानंतर त्याने रागाच्या भरात थेट पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. खाली पडल्यानंतर पीडितेला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. रिद्धीम अरोरा आणि त्याचे वडील सतीश अरोरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त नाही.