Andra Pradesh Accident: तीन वाहनांची धडक, 3 जण दगावले, आंध्रप्रदेशातील घटना

आंध्र प्रदेशातील विजयवाडा गुटूर महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन वाहने एकमेकांना आदळली आहे.

Road Accident

Andra Pradesh Accident: आंध्र प्रदेशातील विजयवाडा गुटूर महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन वाहने एकमेकांना आदळली आहे. गुटुंर जिल्ह्यातील पेडकाकनीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कॉंक्रीट मिक्सर ट्रकला अनियंतित कार आदळल्याने हा अपघात झाला. त्यात आणखी एका वाहनांची धडक झाली. या अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. (हेही वाचा- मुस्लिम महिलेने महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दिला मुलीला जन्म; देवीचे नाव ठेवण्याचा दाम्पत्याचा निर्णय)

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, तीन जण यात दगावले. कार अनियंत्रित झाल्याने कॉंक्रीट मिक्सरच्या ट्रकला धडक दिली. धडकेमुळे ट्रक रस्त्याच्या मधोमध गेला आणि त्याला आणखी एका वाहनाची धडक लागली. या धडकेमुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. भीषण अपघातात तीन्ही वाहनांचे भरपूर नुकसान झाले.

जखमींनार गुटुंर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. के  रामबाबू (40), मधू (25), तेजा (21) या तीन जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. कारमधील प्रवाशी एका कार्यक्रमात जात होते. त्यावेळीस ही घटना घडली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement