Indigo Flight Emergency Landing: दिल्लीहून देवघरला जाणारे इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; लखनऊमध्ये करण्यात आलं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
इंडिगोने माहिती दिली की, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दिल्लीहून देवगडला जाणारे इंडिगोचे फ्लाइट 6E 6191 लखनौकडे वळवण्यात आले.
Indigo Flight Emergency Landing: दिल्लीहून देवघरला (Deoghar) जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात (Indigo Flight) बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लखनौ विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. इंडिगोने माहिती दिली की, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दिल्लीहून देवगडला जाणारे इंडिगोचे फ्लाइट 6E 6191 लखनौकडे वळवण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले असून विमान टेकऑफ करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा तपासात नियमांचे पालन करत आहेत. (हेही वाचा - Air India Express Flight Emergency Landing: केरळला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग; अबुधाबीमध्ये आपत्कालीन लँडिंग)
विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंडिगो फ्लाइट 6E 6191 ला उड्डाणाच्या मध्यभागी बॉम्बची धमकी मिळाली. घाईघाईत विमान लखनौच्या दिशेने वळवण्यात आले. सुरक्षा यंत्रणा तपासात नियमांचे पालन करत आहेत.