1 ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन व्यवहारात झाले आहेत हे महत्वपुर्ण बदल, जाणून घ्या सविस्तर

माहित करुन घ्या काय आहेत हे नवीन बदल:

Representative Image (Photo Credits: Pixabay)

जुलै महिना हा बराच घडामोडींचा महिना होता. यात आपल्या दैनंदिन व्यवहारात बरीच उलथापालथ बरेच बदल करण्यात आले. हे सर्व बदल लागू करण्यात आलेला दिवस म्हणजे आजचा दिवस...1 ऑगस्ट. आजपासून व्याज दर (Interest Rate), जीएसटी (GST Rate), कर्ज दर (Loan) यांसारख्या दैनंदिन व्यवहारातील महत्त्वाच्या गोष्टींमुळे बदल झाले आहेत. त्यातच आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात होऊन नवीन दर 1 ऑगस्ट पासून लागू झाले आहेत.

महिन्याची सुरुवात करण्यासाठी फक्त नवीन बदल कोणते झाले इतकच माहित करुन घेण्यापेक्षा ते नेमके काय आणि कसे अंमलात आणायचे हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. माहित करुन घ्या काय आहेत हे नवीन बदल:

1. SBI चा MPS चार्ज रद्द

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नं आजपासून ऑनलाईन फंड ट्रान्सफर मोफत केले आहेत. 'एसबीआय'कडून आयएमपीएस चार्ज रद्द करण्यात आलेत.

2. SBI चे व्याज दर

स्टेट बँक ऑफ इंडियानं फिक्स्ड डिपॉझिटवर व्याज दर घटवले आहेत. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदर 50 पॉइंटस ते 75 पॉइंटसपर्यंत घटवण्यात आले आहेत.

हेही वाचा- खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, काय आहेत नवीन दर

3. इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटी कमी

इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणं आता आपल्या खिशाला परवडू शकणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर यापूर्वी 12 टक्के जीएसटी टॅक्स लावला जात होता. परंतु आजपासून मात्र या वाहनांवर 5 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. अशावेळी तुम्ही एखादी 10 लाख रुपये किंमतीची इलेक्ट्रिक कार खरेदी केली तर त्यावर तुम्हाला जवळपास 70 हजार रुपयांचा फायदा मिळू शकेल.

4. युनियन बँकेचे कर्ज झाले स्वस्त

युनियन बँक ऑफ इंडियानं MCLR आधारित व्याजदरांत कपात केलीय. नवे दर आजपासून लागू होत आहेत. त्यामुळे कर्जधारकांना 'ईएमआय' अर्थात कर्जाचे हप्त्यांत थोडी सूट मिळणार आहे... आणि कर्जही स्वस्त होणार आहे.

पुन्हा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचे हे नवीन बदल खूपच फायद्याचे आणि दिलासादायक आहे. थोडक्यात सांगायचे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या आर्थिक व्यवहारात बदलाचे वारे वाहू लागले आहेत असच म्हणावं लागेल.