Bihar Rail Engine Theft Case: बोगदा खोदून चोरट्यांनी चोरलं रेल्वेचं इंजिन; बिहारमध्ये चोरांचा अनोखा पराक्रम
यार्डाजवळ एक बोगदा सापडला. यातून चोरट्यांनी रेल्वेचे इंजिन पळवले.
Bihar Engine Rail Theft Case: कार, बस किंवा ट्रक चोरीच्या घटना तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण बिहार (Bihar) मध्ये चोरट्यांनी रेल्वेचे इंजिनचं (Railway Engine) चोरलं आहे. एवढेचं नाही तर चोरट्यांनी रेल्वेचे हे इंजिनही विकलं देखील. मुझफ्फरपूर रेल्वे पोलिसांच्या छाप्यात ही बाब उघड झाली. पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. यासोबतच मुझफ्फरपूरमधील एका भंगाराच्या दुकानातून इंजिनच्या भागांची 13 पोती जप्त करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी बोगदा खोदून ही घटना घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. रोहतास येथील 500 टन वजनाच्या पुलाच्या चोरीनंतरची ही दुसरी मोठी घटना आहे.
बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी येथील गरहारा यार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचे डिझेल इंजिन चोरट्यांनी पळवले. बोगदा करून या टोळीने चोरीची ही मोठी घटना घडवली. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली असून, पोलीस चौकशीत आरोपींनी रेल्वेचे इंजिन चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी सांगितले की, त्यांनी आधी काही भाग चोरले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण इंजिन चोरले. मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीत एका भंगार गोदामातून 13 पोत्यांमध्ये रेल्वे इंजिनचे भाग सापडले. (हेही वाचा - Indian Railway-IRCTC: रात्रीच्या रेल्वे प्रवासात हा नियम ठेवा ध्यानात, TT अजीबात करणार नाही झोपमोड; जाणून घ्या काय आहे नियम?)
बोगदा खोदून रेल्वेचे इंजिन चोरीला गेल्याची घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यार्डाजवळ एक बोगदा सापडला. यातून चोरट्यांनी रेल्वेचे इंजिन पळवले. आरोपींनी आधी इंजिनचे छोट-छोटे भाग चोरले. यानंतर आरोपींनी हे भाग गोण्यांमध्ये भरून वेगवेगळ्या रद्दीच्या दुकानात विकले. पोलिसांनी 13 पोत्यांमध्ये ट्रेनचे इंजिनचे भाग जप्त केले आहेत. (हेही वाचा - Indian Railways: भारतीय रेल्वे सेवेबाबत माहिती हवी आहे? बस्स! फक्त डायल करा '139' नंबर, पाहा कमाल)
दरम्यान, रेल्वेचे इंजिन चोरीला गेल्याची ही पहिलीच घटना नाही. अलीकडेच पूर्णिया जिल्ह्यात चोरट्यांनी विंटेज मीटर गेजचे स्टीम गेज इंजिन चोरून विकले होते. हे इंजिन रेल्वे स्थानकावरील प्रदर्शनात उपस्थित होते.