Haryana Chain Snatch Video: पिझ्झा शॉपमध्ये चोरी, सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार, घटना CCTV कैद

एकीकडे नागरिक संताप व्यक्त करत आहे. यात एक चोरीचा व्हिडिओ समोर आला आहे. हरियाणा येथील पानिपतमध्ये दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून फरार झाला आहे.

Caught On Camera: Chain Snatcher PC TWITTER

Haryana Chain Snatch Video: चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे नागरिक संताप व्यक्त करत आहे. यात एक चोरीचा व्हिडिओ समोर आला आहे. हरियाणा येथील पानिपतमध्ये दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून फरार झाला आहे. ही घटना पिझ्झा शॉपमध्ये घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा- लग्नास नकार दिल्याने महिलेची भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या; मोहालीतील धक्कादायक घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पानिपत शहरातील तहसील कॅम्प रोडवर असलेल्या पिझ्झा शॉपमध्ये घडली आहे. पिझ्झा शॉपमध्ये महिला आपल्या मैत्रिणीसोबत बसली होती. त्यावेळीस हेल्मेट घातलेला एक माणूस येतो. ऑर्डर देण्याच्या बहाणे ती शॉपच्या काऊंटर उभा राहतो. वेळ साधून महिलेच्या गळातील चैन हिसकावून फरार होतो.

सोनसाखळी हिसकावून पिझ्झा शॉममधून चोरटा फरार झाला. पीडितेच्या मैत्रिणीने चोरट्याचा पाठलाग करत मागे पळत सुटली. माहितीनुसार, साखळीचे वजन 20 ग्रॅम असल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत शॉपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. या घटनेनंतर शॉममध्ये गोंधळ निर्माण झाला होता.