National Family Health Survey: दारु पिण्याच्या प्रकरणांमध्ये बिहार राज्यात वाढ, तर महाराष्ट्रातही 'एवढे' आहे प्रमाण

ही बाब सुद्धा गंभीर आहे कारण बिहारमध्ये दारूबंदी होऊन 5 वर्षे झाली आहेत. 2016 मध्ये बिहारमध्ये दारूवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. यानंतरही दरवर्षी विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे.

बिहारमध्ये (Bihar) गेल्या काही दिवसांत बनावट दारू (Alcohol) प्यायल्याने 45 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बाब सुद्धा गंभीर आहे कारण बिहारमध्ये दारूबंदी होऊन 5 वर्षे झाली आहेत. 2016 मध्ये बिहारमध्ये दारूवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. यानंतरही दरवर्षी विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे.  2021 मध्ये, गेल्या 4 वर्षांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (National Family Health Survey) 2020 च्या अहवालानुसार, बिहारमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 15.5% पुरुष अजूनही दारूचे सेवन करतात.  एवढेच नाही तर कोरडे राज्य असूनही महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये जास्त लोक दारू पितात.

आकडेवारी सांगते की बिहारमध्ये 15.5 टक्के पुरुष दारूचे सेवन करतात, तर महाराष्ट्रात दारूवर बंदी नाही, परंतु दारू पिणाऱ्या पुरुषांची संख्या केवळ 13.9 टक्के आहे. एप्रिल 2016 मध्ये, बिहारच्या नितीश सरकारने कठोर दारूबंदी आणि अबकारी कायदा लागू केला होता आणि या कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद केली होती. हेही वाचा Tamilnadu Rain: चैन्नईमध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद व्हिडिओ पहिली का? पुरग्रस्ताला केली मदत

मात्र, नवीन कायद्यांतर्गत राज्यात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून 30 लाख लिटरहून अधिक दारू जप्त करण्यात आली आहे. राज्यातील किमान 52 पोलिस अधिकाऱ्यांना नवीन कायद्यानुसार चौकशीला सामोरे जावे लागले आहे, तर त्यापैकी 36 जणांना निलंबित करण्यात आले आहे किंवा ते विभागीय आणि प्रशासकीय चौकशीला सामोरे जात आहेत.

नवीनतम NFHS-5 अहवालात असे नमूद केले आहे की राज्यातील 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 15.5 टक्के पुरुषांनी दारूचे सेवन केले, तर केवळ 0.4% महिलांनी असेच केले. त्याच वयोगटातील 48.8% पुरुष तंबाखू वापरतात, तर केवळ 5.0% स्त्रिया तंबाखूचा वापर करतात. एवढेच नाही तर, या अहवालानुसार, बिहारमधील सुमारे 77% महिलांचे स्वतःचे बँक खाते आहे आणि त्यापैकी 51% पेक्षा जास्त मोबाईल फोन वापरतात. 9 जुलै 2019 ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.