Kanjhawala Case: क्रूरतेचा कळस! माहीत असूनही अंजलीचा मृतदेह 12 किमीपर्यंत नेला ओढून; आरोपीची कबुली
दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत बसलेल्या आरोपींनी कबुली दिली आहे की, घटनेनंतर काही वेळातच मुलीचा मृतदेह वाहनात अडकल्याची माहिती त्यांना मिळाली होती. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, आरोपींना मृतदेह बाहेर काढताना पाहिले तर आपण अडकून पडू शकतो, या भीतीने त्यांनी मृतदेह बाहेर काढला नाही.
Kanjhawala Case: कांजवाला (Kanjhawala) प्रकरणात आरोपींनी निर्दयतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याप्रकरणी आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत बसलेल्या आरोपींनी कबुली दिली आहे की, घटनेनंतर काही वेळातच मुलीचा मृतदेह वाहनात अडकल्याची माहिती त्यांना मिळाली होती. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, आरोपींना मृतदेह बाहेर काढताना पाहिले तर आपण अडकून पडू शकतो, या भीतीने त्यांनी मृतदेह बाहेर काढला नाही. त्यामुळे चालत्या वाहनातून मृतदेह आपोआप बाहेर येईल, असे आरोपींना वाटले.
म्हणजेच या आरोपींना त्यांच्या गाडीत एक मृतदेह लटकत असल्याची कल्पना होती. त्यानंतर आरोपींनी या प्रकरणात अडकण्याच्या भीतीने मृतदेह कित्येक किलोमीटरपर्यंत ओढून नेला. आरोपींनी स्वतः पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अचानक असे खुलासे होत आहेत, त्यामुळे लोकांचा रोष वाढत आहे. (हेही वाचा -Kanjhawala Death Case: कांजवाला मृत्यू प्रकरणी सातवा आरोपी अंकुशला दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाकडून जामीन मंजूर)
कांजवाला अपघात प्रकरणातील आरोपींचा बचाव करणाऱ्या अंकुश खन्ना याला दिल्ली न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. महानगर दंडाधिकारी सान्या दलाल यांनी शरणागती पत्करलेल्या खन्ना यांना जामीन मंजूर केला. त्यांच्यावरील आरोप जामीनपात्र असल्याचे निरीक्षण नोंदवून आरोपीला 20,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. (हेही वाचा - Sultanpuri Horror Case: गाडीच्या पुढील बाजूने डाव्या चाकात अडकली होती अंजली; टायरजवळ आढळल्या रक्ताच्या खुणा, FSL रिपोर्टमध्ये झाले अनेक खुलासे)
दरम्यान, 31 डिसेंबर रोजी रात्री कांजवालाच्या रस्त्यावर जी घटना घडली ती अतिशय वेदनादायी होती. रविवारी रात्री अंजली एका कार्यक्रमातून आपल्या स्कूटीवरून घरी परतत होती. त्यानंतर तिचा अपघात झाला आणि आरोपी मृतदेहाला लटकवून सुमारे 12 किलोमीटर कार चालवत राहिले. आता आरोपींनीही कबुली दिली आहे की, त्यांना कारमध्ये लटकलेल्या मृतदेहाची आधीच माहिती होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)