Karnataka Crime: विकृतीचा कळस ! कर्नाटकमध्ये शाळेत मोबाईल आणला म्हणून मुख्याध्यापिकेने विद्यार्थीनीला केले विवस्त्र
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकावर कठोर कारवाईची शिफारस केली आहे.
कर्नाटकात (Karnataka) शाळेत मोबाईल (Mobile) घेऊन जाणाऱ्या विद्यार्थीनीला (Student) निर्वस्त्र केल्या प्रकरणी एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक (Arrest) करण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकावर कठोर कारवाईची शिफारस केली आहे. मंड्या (Mandya) जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. जिथे सुमारे 47 विद्यार्थी 8, 9 आणि 10 इयत्तेत शिकतात. शिक्षण विभागातील एका सूत्रानुसार, मुख्याध्यापिकेने गेल्या आठवड्यात शाळेत अचानक तपासणी केली. ज्यामध्ये तिने एका विद्यार्थिनीचा सेलफोन ट्रॅक केला. शिक्षा म्हणून तिला विवस्त्र करून पंख्याखाली बसण्यास भाग पाडले. विद्यार्थिनीने नंतर तिच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. हेही वाचा Pune: वयाच्या 86 व्या वर्षी लग्न करण्याची वडिलांना इच्छा, मॅरेज ब्युरोत नावही नोंदवले; मुलाकडून हत्या
त्यांनी ही बाब ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (BEO) यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचा समावेश असलेल्या शाळा विकास देखरेख समितीने (SDMC) या घटनेचा अहवाल बीईओला सादर केला. मंड्या जिल्ह्याचे सार्वजनिक सूचना उपसंचालक जावेरेगौडा यांनी सांगितले की पुढील कारवाईसाठी अहवाल मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.