Uttar Pradesh: पिंताबरपूर रेल्वे स्थानकाजवळ आढळला सहा वर्षाच्या मुलीचा शिरच्छेद अवस्थेतील मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

बरेली येथील पिंताबरपूर रेल्वे स्थानकाजवळ एका सहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. धक्कादायक म्हणजे शिरच्छेद अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळा धाव घेतली.

Uttar Pradesh: पिंताबरपूर रेल्वे स्थानकाजवळ आढळला सहा वर्षाच्या मुलीचा शिरच्छेद अवस्थेतील मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु
Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Uttar Pradesh: बरेली येथील पिंताबरपूर  रेल्वे स्थानकाजवळ एका सहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. धक्कादायक म्हणजे शिरच्छेद अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळा धाव घेतली. दक्षिण विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक मानुष पारेख यांनी ही घटना खूनाची नसल्याचे व्यक्त केले आहे. (हेही वाचा- चोर असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करून ठार मारणाऱ्या चौघांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, हा रेल्वे अपघात असू शकतो. किंवा मुलीला एका जंगली प्राण्याने शिकार केला असावा या दोन्ही घटनांपैकी एक कारण असावे. तीचं शरिर आणि डोके वेगवेगळे झाले आहे. हा विचित्र अपघात असू शकतो. मुलीचा शिरच्छेद मृतदेह आढळून आल्याची माहिती गावात पसरली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह सात ते आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस या प्रकरणी बारकाईने लक्ष देत आहे.शवविच्छेदनातून मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल त्यामुळे अहवालाची प्रतिक्षा आहे. मुली संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2024 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).