Clean Ganga Mission: केंद्र सरकार माशांच्या माध्यमातून शोधणार गंगेच्या स्वच्छतेची पातळी; 'या' पद्धतीने होणार नदीच्या आरोग्याची तपासणी
ज्याद्वारे पवित्र नदीचे आरोग्य तपासले जाऊ शकते. सरकारच्या म्हणण्यानुसार, नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (National Mission for Clean Ganga, NMCG) चे शास्त्रज्ञ औद्योगिक संशोधन परिषद आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या मदतीने याचा अभ्यास करतील.
Clean Ganga Mission: गंगा नदी (Ganga River) च्या स्वच्छतेचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकार आता माशांच्या दोन प्रजातींचा वापर करणार आहे. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार डॉल्फिन (Dolphins) आणि हिल्सा (Hilsa) माशांच्या जीवनचक्राचा अभ्यास करेल. ज्याद्वारे पवित्र नदीचे आरोग्य तपासले जाऊ शकते. सरकारच्या म्हणण्यानुसार, नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (National Mission for Clean Ganga, NMCG) चे शास्त्रज्ञ औद्योगिक संशोधन परिषद आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या मदतीने याचा अभ्यास करतील. त्याअंतर्गत डॉल्फिन, हिल्सा मासे आणि सूक्ष्मजीव यांच्या संख्येचा अभ्यास केला जाणार आहे. ज्यावरून नदी किती स्वच्छ आहे हे कळेल.
नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) चे महासंचालक जी अशोक कुमार यांनी सांगितलं की, जैव-निर्देशक नदीचे आरोग्य स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही NMCG अंतर्गत अनेक उपक्रम घेतले आहेत. त्यात आता किती सुधारणा झाली आहेत हे आम्ही अभ्यासाद्वारे तपासणार आहोत. यात सूक्ष्मजीव विविधतेवर मानवी हस्तक्षेपाचा प्रभाव कसा होतो याचाही अभ्यास केला जाईल. (हेही वाचा - Plastic Straw Ban: प्लास्टिक स्ट्रॉवर पूर्णपणे बंदी? केंद्र सरकारचा निर्णय, Amul ने स्ट्रॉच्या वापरासाठी मागितली मुदतवाढ)
वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा अभ्यास नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा द्वारे गंगा नदीवर करण्यात येत असलेल्या अभ्यास आणि संशोधनाचा एक भाग आहे. गंगा नदीशी संबंधित विषयांवर संशोधन, धोरण आणि ज्ञान व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
गंगा नदीच्या आरोग्याची तपासणी कशी होणार?
NMCG नुसार, हिल्सा आणि डॉल्फिन माशांची सध्याची संख्या आणि पूर्वीच्या संख्येमध्ये तुलना केली जाईल. माशांची संख्या वाढली असेल, तर गंगा किती स्वच्छ झाली आहे, हे कळेल. माशांची संख्या कमी झाली असेल तर याचा अर्थ गंगा अजून स्वच्छ नाही. कुमार यांनी सांगितलं की, एनएमसीजी आणि सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रयत्नांमुळे माशांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने जीवनमान सुधारेल. तसेच नदीतील डॉल्फिन, मगरी, कासव आणि गंगेतील जलीय जैवविविधतेचे संरक्षण होईल.
कुमार यांनी पुढे बोलताना सांगितलं की, गेल्या चार वर्षांत नदीकाठी राहणाऱ्या मच्छिमारांना उपजीविका आणि आर्थिक स्थैर्य देणार्या नदीतून सुमारे 190 मत्स्य प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. गंगा नदी आणि तिचे खोरे जगातील सर्वाधिक लोकसंख्येपैकी एक मानले जाते.