Jammu and Kashmir Terrorists Attack: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; राजौरीतील लष्कराच्या छावणीवर गोळीबार
जवानांच्या छावणीवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत.
Jammu and Kashmir Terrorists Attack: अगदी आठवडाभरापूर्वी जम्मूच्या डोडा येथे दशतवाद्यांनी अचानक भारतीय जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे (Indian Army) 4 जवान शहीद झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी राजौरीतील खवास भागात हल्ला केला आहे. जवानांच्या छावणीवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (हेही वाचा:Terrorist Attack in Jammu and Kashmir: कठुआ येथे लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान शहीद )
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे राजौरीतील गुंडा भागात संशयित दहशतवाद्यांनी (Terrorists Attack) सुरक्षा चौकीवर गोळीबार केला. राजौरीचे एसएसपी आणि एसओजी म्हणजेच पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप घटनास्थळी पोहोचले आहे. पहाटे ४ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय जवानांनी देखील दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलं आहे. या हल्ल्यात काही जवान जखमी झाले आहेत. (हेही वाचा:Jammu and Kashmir Encounter: डोडामध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एका अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद )
हल्ल्यानंतर दहशतवादी लपून बसले आहेत. लष्कराने परिसरात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. राजौरीतील एका दुर्गम गावात झालेला दहशतवादी हल्ला भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना सातत्याने दहशतवादी लक्ष्य करीत आहेत.
पोस्ट पहा
गेल्या सोमवारी देखील जम्मूच्या डोडा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कराचे ४ जवान गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आलं होतं. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.