Telangana Govt Mahalaxmi Scheme: सार्वजनिक वाहतूक सेवेत महिलांना मोफत प्रवास, आरोग्य विमा कवच योजना मर्यादेतही 10 लाख रुपयांपर्यंतची वाढ; सत्तेत येताच काँग्रेस सरकारचा तेलंगणात महत्त्वपूर्ण निर्णय

तेलंगणात लोकशाही मार्गाने सरकार चालविण्यात येईल आणि कल्याणकारी राज्य म्हणून तेलंगण नावारुपास येईल, असा विश्वास या योजनेचे अनावरण करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी व्यक्त केला.

Revanth Reddy (PC - Facebook)

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Telangan Assambly Election) प्रचारात जनतेला दिलेल्या सहा आश्वासनांपैकी काँग्रेसने (Congress) दोन आश्वासनांची अंमलबजावणी आजपासून सुरू केली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Revanth Reddy) सरकारने महिलांसाठी मोफत बस सेवा योजना सुरू केली. तसेच आरोग्यश्री आरोग्य विमा कवचची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारच्या महालक्ष्मी योजनेनुसार महिलांना आता प्रदेशात राज्य परिवहन महामंडळाच्या एक्स्प्रेस आणि साध्या बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय दहा लाखांपर्यंतच्या मोफत उपचाराशी संबंधित आरोग्य श्री योजनेचे देखील अनावरण करण्यात आले. (हेही वाचा - Telangana CM Revanth Reddy यांनी विधानसभेमध्ये घेतली आमदारकीची शपथ (Watch Video))

तेलंगणात लोकशाही मार्गाने सरकार चालविण्यात येईल आणि कल्याणकारी राज्य म्हणून तेलंगण नावारुपास येईल, असा विश्वास या योजनेचे अनावरण करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी व्यक्त केला. दरम्यान, कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील विजेच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांना कृषी क्षेत्रासह सर्व क्षेत्रांना चोवीस तास अखंड विजपुरवठा करण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यावेळी जागतिक अजिंक्यपद विजेता, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता, मुष्टियोद्धा निखत जरीन याला पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी दोन कोटी रुपयांचा धनादेश दिला.