Telangana Girl Suicide: वर्गात वाढदिवस साजरा केल्याबद्दल शिक्षकाने फटकारले, तेलगंणा येथील तरुणीची आत्महत्या
एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
Telangana Girl Suicide: तेलगंणातील भूपालपल्ली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी तरूणीने राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. बी वैष्णवी असं मृत तरुणीचं नाव होते. तिने टोकाचे पाऊल का उचलले आहे याचे नेमके कारण समोर आले आहे. (हेही वाचा- महिला पोलिस कर्मचाऱ्याने मुख्यालयात केला आत्महत्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी राहत्या घरात विष प्राशन केले आहे जेव्हा तीच्या घरी कोणी नव्हते. वैष्णवी मंचेरियल येथे पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. वैष्णवीने नुकताच तिचा वाढदिवस होता .तिने वर्गात मित्रांसोबत साजरा केला होता. वर्गात वाढदिवस साजरा केल्यामुळे तिच्या शिक्षकांनी फटकारलं होते. याच गोष्टीचा राग अनावर झाला. १७ मार्च रोजी वैष्णवी कॉलेजवरून घरी आली.
घरी आईवडील नव्हती. ते दोघे कामावर गेले होते. त्यानंतर वैष्णवीने घरात असलेले कीटकनाशक प्राशान केलं होतं. तिचे वडिल घरी परत आल्यानंतर त्यांना वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत पडलेली सापडली. त्यांनी तातडीने वैष्णवीला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी वैष्णवीवर उपचार सुरु केले. परंतु उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तीला मृत घोषित केलं. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.