Targeted Killing in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; पुलवामामध्ये बँक सुरक्षा रक्षकाची गोळ्या झाडून हत्या

संजय शर्मा असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या भागात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे.

Targeted Killing in Jammu Kashmir (PC - ANI/Twitter)

Targeted Killing in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग (Targeted Killing) ची घटना समोर आली आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी बँकेच्या सुरक्षा रक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. संजय शर्मा असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या भागात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांनीही परिसराची नाकेबंदी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय शर्मा हे बाजारात जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात संजय शर्मा जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (हेही वाचा -Target Killing in Kashmir: J&K च्या Shopian भागातील Apple Orchid मध्ये कश्मिरी पंडीत भावांवर दहशतवाद्यांकडून हल्ला; एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी)

जिल्हा रुग्णालयाचे (पुलवामा) वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुला यांनी पुष्टी केली की, त्या व्यक्तीला रुग्णालयात आणण्यात आले होते. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी 24 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्येही दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. ज्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा येथील हसनपोआ भागातील रहिवासी असिफ अली गनी यांच्यावर अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने तो जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif