Tanishq Gold Coin ATM: तनिष्क ज्वेलर्सने लाँच केले 'गोल्ड कॉईन एटीएम'; एटीएममधून नोटा नाही, तर सोन्याची नाणी पडत आहेत बाहेर

हे गोल्ड कॉईन एटीएम सुरू झाल्यानंतर सोन्याची नाणी घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा झाला आहे.

Gold Coin, ATM (PC- pixabay)

Tanishq Gold Coin ATM: एटीएम 100, 200 आणि 500 ​​च्या नोटा नव्हे तर सोन्याची नाणी (Gold Coin) देऊ लागल्यास काय होईल? सुरुवातीला तुम्हाला हे विचित्र वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे. होय, तनिष्क ज्वेलर्सने 'गोल्ड कॉईन एटीएम' (Gold Coin ATM) लॉन्च केले आहे. हे गोल्ड कॉईन एटीएम सुरू झाल्यानंतर सोन्याची नाणी घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा झाला आहे.

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला सोन्याची नाणी घ्यायची असतील तर आता तुम्हाला तासनतास गर्दीत थांबावे लागणार नाही. होय, आता जसे तुम्हाला ATM मधून पैसे मिळतात तसे तुम्हाला Gold Coin ATM मधून सोन्याची नाणी मिळतील. तनिष्कने सुरू केलेल्या या एटीएममधून तुम्ही 1 ग्रॅम आणि 2 ग्रॅमची 24 कॅरेट सोन्याची नाणी खरेदी करू शकता. (हेही वाचा - Central Government Cuts Wheat Quota Under PMGKAY: जूनपासून शिधापत्रिकाधारकांना मिळणार कमी गहू; आणखी काय परिणाम होणार? वाचा सविस्तर)

तनिष्कने 21 ज्वेलरी शोरूममध्ये बसवले एटीएम -

तनिष्कने निवडक 21 ज्वेलरी शोरूममध्ये गोल्ड कॉईन एटीएम बसवले आहेत. कंपनीने गेल्या काही दिवसांत दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड कॉईन एटीएममधून 25 लाख रुपयांची सोन्याची नाणी बुक करण्यात आली आहेत. हे सोने वितरण मशीन बँकेच्या एटीएमप्रमाणे काम करते.

Gold Coin ATM कसे काम करते? जाणून घ्या

कंपनीने दिलेल्या माहितीत 'तनिष्क गोल्ड कॉइन एटीएम' बँकेच्या एटीएमप्रमाणे काम करते, असे सांगण्यात आले आहे. ग्राहकाच्या वतीने सोन्याचे नाणे निवडताना मशीनच्या बाजूने पैशांची माहिती दिली जाते आणि पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पेमेंट केल्यावर, हे मशीन पॅक केलेले सोन्याचे नाणे काढते.