तामिळनाडू: गंगाई अम्मन मंदिराजवळ स्फोट; १ ठार, ४ जखमी

तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील गंगाई अम्मन मंदिराजवळ अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. या स्फोटात एक व्यक्ती जागीच ठार झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

photo credit- twitter

तामिळनाडूच्या  (TamilNadu) कांचीपुरम (Kanchipuram) येथील गंगाई अम्मन मंदिराजवळ (Gnagai Amman Temple) अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. या स्फोटात एक व्यक्ती जागीच ठार झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या दरम्यान ५ संशयित व्यक्ती मंदिराजवळ फिरत होते. तसेच त्याच्या हातात एक बॉक्स होता. त्यानंतर त्यांच्या हातात असलेला बॉक्स त्यांनी उघडला आणि स्फोट झाला, असे प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले आहे. या घटनेत एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट करणारे व्यक्ती कोण होते? स्फोट करण्यामागचे नेमके कारण काय आहे? याचा स्थानिक पोलीस कसून शोध घेत आहेत. हे देखील वाचा-अहमदनगर: एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पारनेर तारुक्यातील गुणोरे गावातील घटना

एएनआयचे (ANI)  ट्वीट-

तसेच, मंदिराजवळ स्फोट झाल्याचे समजताच बॉम्ब पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब पथकाने परिसरातील नमुने जप्त केले आहेत. तो आयईडी स्फोट होता की नाही? याची चाचणी सुरू आहे.

 

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement