Group Captain Varun Singh Passes Away: तमिळनाडू लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेमधील बचावलेल्या वरुण सिंह यांचे उपचारादरम्यान निधन, पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी व्यक्त केले शोक
भारतीय वायुसेना तीव्र शोक व्यक्त करते आणि शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे.
तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात (TamilNadu Chopper Crash) गंभीर जखमी झालेले हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Group Captain Varun Singh) यांचे बुधवारी सकाळी बेंगळुरू येथील लष्करी रुग्णालयात निधन झाले. भारतीय हवाई दलाने (IAF) सांगितले की, 'शूर' ग्रुप कॅप्टनचा आज सकाळी मृत्यू झाला. तामिळनाडू मधील लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांची देशासाठी केलेली भरीव सेवा कधीही विसरता येणार नाही. त्याचवेळी गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. वायुसेनेने ट्विट केले की, 'IAF' कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की 8 डिसेंबर 2021 रोजी हेलिकॉप्टर अपघातात जखमी झालेले बहादूर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे आज सकाळी निधन झाले. भारतीय वायुसेना तीव्र शोक व्यक्त करते आणि शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे.
Tweet
या अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 लष्करी जवानांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी एका मोठ्या तांत्रिक अडचणीमुळे तेजस फायटर जेटला यशस्वीरित्या वाचवल्याबद्दल ग्रुप कॅप्टन वरून सिंग यांना ऑगस्टमध्ये शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते. (हे ही वाचा Who Will Be Next CDS: बिपिन रावत यांच्या निधनानंतर देशातील आगामी CDS कोण होणार? शर्यतीत ही दोन नावे पुढे.)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात गंभीर जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या निधनाबद्दल जाणून घेऊन अत्यंत दु:ख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो. मी माझ्या मनापासून शोक व्यक्त करतो.
Tweet
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, 'देशासाठी त्यांनी केलेली भरीव सेवा कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो.'
Tweet
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेत जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजनाथ सिंह म्हणाले, 'ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हा खरा योद्धा होता जो शेवटच्या श्वासापर्यंत लढला. त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत माझ्या संवेदना आहेत. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत.