Sushant Singh Rajput Suicide: 'एक तेजस्वी तरुण अभिनेता हरपला' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशांत सिंह राजपूत बाबत व्यक्त केल्या भावना
बॉलिवूड कलाकारांपासून ते राजकीय नेते मंडळींनी सुशांत सिंह यांने केलेल्या आत्महत्येबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
Sushant Singh Rajput Suicide: बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याने आता भल्याभल्यांच्या पायाखालची जमीन सरकरली आहे. बॉलिवूड कलाकारांपासून ते राजकीय नेते मंडळींनी सुशांत सिंह यांने केलेल्या आत्महत्येबाबत दु:ख व्यक्त केले आहे. असे सांगितले जात आहे की, सुशांत याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सुशांतच्या जाण्याने खरंच कोणाला विश्वास बसत नाही आहे पण प्रत्येकाला या घटनेमुळे काय करावे हे सुचनेनासे झाले आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सुशांत सिंह राजपूत याच्या या आत्महत्येबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, एक तेजस्वी तरुण अभिनेता हरपला.(Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना)
नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत पुढे असे म्हटले आहे की, सुशांत याने टीव्ही आणि सिनेमांच्या माध्यमातून उत्कृष कामगिरी केली. मनोरंजनाच्या जगात त्याच्यामुळे बहुतांश जणांना प्रेरणा मिळण्यासह त्याने आपल्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे. हे खुपच धक्कादायक आहे त्याचे निधन झाले. माझ्या संवेदना सुशांत याच्या परिवारासह चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती: असे शेवटी मोदी यांनी म्हटले आहे.(Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत च्या निधनानंतर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, संजय राऊत, अनिल देशमुख, जयंत पाटील यांच्यासह 'या नेत्यांनी व्यक्त केला खेद पहा ट्विट)
तर अभिनेत्री श्रद्धा कपूर सह सुशांत सिंह राजपूत 'छिछोरे' या शेवटच्या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 'पवित्र रिश्ता' आणि 'किस देश में है मेरा दिल' या मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती.