Surgical Strike 2: पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या12 व्या दिवशी लष्कराने बदला घेतलेल्या 12 मिराज विमानाची खास वैशिष्ट्य

तेथे 21 मिनिटं सुमारे 1000 किलो बॉम्ब हल्ला करून विमानं सुरक्षितपणे परत भारतामध्ये परतली

Mirage 2000 (File Photo)

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulwama Terror Attack) बदला भारताने एअर स्ट्राईक करून करण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मिरमध्ये (POK) दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये शेकडो दहशतवादी ठार करण्यात आले आहे. हा सर्जिकल स्ट्राईक मिराज विमानांच्या मदतीने करण्यात आला होता. जैश ए मोहम्मदचे ( Jaish-e-Mohammad)  दहशतवादी कॅम्प उडवण्यात यश आलं आहे. मिराज 2000 (Mirage 2000) विमानांचा नेमका का वापर करण्यात आला हे नक्की जाणून घ्या. Pulwama Terror Attack ते Surgical Strike 2 चा घटनाक्रम,भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे

मिराज 2000 ची वैशिट्य काय?

भारताची वायुसेनेची 12 मिराज विमानं पाकव्याप्त काश्मिरमध्ये गेली. तेथे 21 मिनिटं सुमारे 1000 किलो बॉम्ब हल्ला करून विमानं सुरक्षितपणे परत भारतामध्ये परतली. यामध्ये दहशतवादी संघटनांची कंट्रोल रूम उद्धवस्त करण्यात आली. शेकडो दहशतवादी यामध्ये ठार झाली. भारतीय हवाई दलाच्या १२ विमानांचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले; जैश-ए-मोहम्मदची कंट्रोल रुम उद्ध्वस्त

सर्जिकल स्ट्राईक होणार याचा अंदाज भारतीय लष्कर, वायुसेनापासून सामन्यांना होती. या हल्ल्याबाबत भारतीय लष्कराकडून किंवा सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.