Ludhiana Suicide Case: मानसिक छळाला कंटाळून 8 वीच्या वर्गातील विद्यार्थीनीने उचललं धक्कादायक पाऊल; शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी शाळा प्रशासनाने मुलीच्या कपाळावर आणि हातावर 'चोर' लिहून संपूर्ण शाळेत परेड केली होती. यानंतर विद्यार्थी खूप दडपणाखाली आली.

Suicide | (Photo Credits: Pixabay)

Ludhiana Suicide Case: लुधियानाच्या (Ludiyana) ग्यासपुरा येथून एका खासगी शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून विद्यार्थिनीने हे पाऊल उचलले.

मिळालेल्या माहितीनुसार, लुधियानाच्या ग्यासपुरा येथील एका खासगी शाळेत विद्यार्थिनी आठवीच्या वर्गात शिकते. काही दिवसांपूर्वी शाळा प्रशासनाने मुलीच्या कपाळावर आणि हातावर 'चोर' लिहून संपूर्ण शाळेत परेड केली होती. यानंतर विद्यार्थी खूप दडपणाखाली आली. शाळेच्या या वागणुकीमुळे विद्यार्थिनी मानसिक नैराश्याला बळी पडली आणि आत्महत्या करण्यासाठी तिने स्वतःच्याच शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. (हेही वाचा - Delhi Crime: सुनेवर अॅसिड फेकल्या प्रकरणी सासूला अटक, दिल्लीतील खळबळजनक घटना)

आपल्या मुलीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे पीडित विद्यार्थीनीच्या वडिलांना खूप दुःख झाले आहे. याबाबत त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती दिली. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील लोकांच्या मदतीने शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन केलं.

विद्यार्थ्याच्या उपचारासाठी दीड लाख रुपये देऊन शाळा प्रशासन वेगळे झाले. यानंतर एकदाही विद्यार्थीनीच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचा प्रयत्न झाला नाही. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याच्या वडिलांची संमती घेतली आणि केस वगळण्यासाठी त्यांना कोऱ्या कागदावर सही करायला लावली. विद्यार्थ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्याच्या कमरेला आणि मणक्याला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.



संबंधित बातम्या