Animal Cruelty in Andhra Pradesh: भटक्या गर्भवती कुत्रीची हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल, आंध्र प्रदेशातील घटना

दोन दिवसांपूर्वी १७ मे रोजी मध्यरात्री एका कसाईने भटक्या गर्भवती कुत्रीवर चाकून हल्ला केला. या घटनेत दुर्दैवाने तीचा मृत्यू झाला

हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Animal Cruelty in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी १७ मे रोजी मध्यरात्री एका कसाईने भटक्या गर्भवती कुत्रीवर चाकून हल्ला केला. या घटनेत दुर्दैवाने तीचा मृत्यू झाला. कुत्री मारल्याची माहिती एकाने आंध्र प्रदेशातील नल्लापाडू पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून कुत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस याचा तपास करत आहे. या घटनेनंतर परिसरातील प्राणी प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- रणथंबोर नॅशनल पार्कमधून 'शक्ती' वाघिणीची मनमोहक दृश्य समोर; सिंगापूरचे उच्च आयुक्त सायमन वोंग यांच्याकडून ट्विट)

मिळालेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी मध्यरात्री कुणीतरी एकाने गर्भवती कुत्रीवर चाकूने हल्ला केला होता. या हल्लात कुत्री गंभीर जखमी झाल्याने तीच्या शरिरातून अधिक रक्तस्त्राव होऊ लागला होता. त्यात तीचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी प्राणी हत्याचा गुन्हा दाखल केला आहे. नल्लापाडू पोलिस या प्रकरणी तपासणी करत आहे.

सर्कल इन्स्पेक्टर सुरेश कुमार यांनी कुत्रीच्या हत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी कुत्रीचा मृतदेह ताब्यात घेतले आहे. परिसरातील नागरिकांनी गुन्हेवर संताप व्यक्त केला असून आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. दिवसेंदिवस प्राण्यावर क्रुरता वाढत आहे. लखनौ येथे एका वृध्द व्यक्तीने दोन पिल्लांना रस्त्यावरून उचलून घरी नेल्यानंतर त्यांची हत्या केली. यानंतर त्यांनी त्या दोन पिल्लांना पॉलिथिनच्या पिशवीत घेऊन कुठेतरी फेकून दिले. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.