UP Crime: भटक्या कुत्र्यांना लोखंडी रॉडने मारहाण, संतापलेल्या तरुणाकडून स्थानिकांवर हल्ला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

लोखंडी रॉडने एका भटक्या कुत्र्याला मारहाण केले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

stray DOG pc twitter

UP Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील (Gaziyabad) आदित्य वर्ल्ड सिटीच्या अर्बन होम्स सोसायटीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लोखंडी रॉडने एका भटक्या कुत्र्याला मारहाण केले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर उपस्थितीत असलेल्या स्थानिकांनी संपात व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर कुत्र्यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीने स्थानिकांवर रोष दाखवला आहे. (हेही वाचा- कुर्ला परिसरात हल्लोखोरांची दहशत, चाकूच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबाद येथे एका व्यक्तीने भटक्या कुत्र्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. मारहाण केल्यानंतर ही त्यांने पाठलाग सुरुच ठेवला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहकारी रहिवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वाद टोकाला गेला आणि उपस्थित असलेल्या वॉचमॅनला आणि लोकांना मारहाण केली. लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. भांडणा दरम्यान मारहाण करणारा व्यक्ती स्वत: ला अधिकारी म्हणून घेत होता.

व्हिडिओ @KasanaYashpal ने X वर पोस्ट केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्संनी संताप व्यक्त केला आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif