Double Murder case: अपमान केल्याच्या रागातून मुलाने उचलेले टोकाचे पाऊल; वडील आणि आजोबांची केली हत्या

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका मुलाने घरातील दोघांचा खून केल्याची घटना समोर आली आहे, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपमान केल्याने मुलाने वडिल आणि आजोबांची हत्या केली.

Crime (PC- File Image)

Double Murder case: उत्तर प्रदेशात नोएडा येथील बल्लुखेडा गावात दुहेर हत्याकांडाचा दुर्घटना उघडकीस आली आहे. सोसल मीडियावर वरिल एका स्टारने वडिलांची आणि आजोबांची हत्या केल्या प्रकरणी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीने फावड्याचा वापर करत पीडितांवर वार केला. सपासप वार केल्याने दोघेही जखमी झाले. यात दोघांचा मृत्यू झाला. वडिल आणि मुलामध्ये भांडण झाले आणि वडिलांनी भांडणात आरोपीचा अपमान केल्याने मुलाचा राग अनावर झाला आणि त्याने हत्या केली. पोलीसांनी आरोपी मुलाला बेड्या घातल्या आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जस्मीन असं आरोपीचे नाव असून त्याने गुन्हा कबुल केला आहे. विक्रमजीत असे आरोपीच्या वडिलांचे नाव होते. ज्याची त्याने हत्या केली. आरोपीला पोलीसांनी न्यायालयात हजर केले,तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विक्रमजीतने त्याची सर्व संपत्ती गर्लफ्रेंडवर आणि दारूवर उधळल्याने घरात मुलामध्ये वाद झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी विक्रीमजीत आणि मुलगा जॅस्मिन यांच्यात कडक्याचे भांडण झाले. यावेळी जॅस्मिनचा मुलगा, पत्नी आणि मुली देखील समोर होत्या. हा अपमान सहन न झाल्याने आरोपी जस्मीनने रागाच्या भारत वडिल विक्रमजीत यांची हत्या केली.
७ सप्टेंबर रोजी मुलाने कट रचून वडिलांवर फावड्याने हल्ला केला. आरडाओरड ऐकून आजोबा बाहेर आले. त्याने आजोबांवर हल्ला केला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच, पोलीसांना फोन केला. पोलीसांनी घटनास्थळी येवून संपुर्ण तपासणी केली तेव्हा त्याला मुलावर संशय आला. त्याला ताब्यात घेवून विचारपुस केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात शोककला पसरली.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement