Coronavirus Update In India: गेल्या 24 तासात देशात 64,531 नव्या कोरोग्रस्तांची नोंद, तर 1092 जणांचा मृत्यू

तर 1092 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 27 लाख 67 हजार 274 इतकी झाली आहे. सध्या 6 लाख 76 हजार 514 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 20 लाख 37 हजार 871 जणांची कोरोना विरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या सर्वांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

Coronavirus Update In India: भारतात गेल्या 24 तासात 64,531 नव्या कोरोग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. तर 1092 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 27 लाख 67 हजार 274 इतकी झाली आहे. सध्या 6 लाख 76 हजार 514 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 20 लाख 37 हजार 871 जणांची कोरोना विरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या सर्वांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत 52 हजार 889 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. दरम्यान, 18 ऑगस्टपर्यंत देशात एकूण 3,17,42,782 चाचण्या घेण्यात आल्या, तसेच मंगळवारी देशात 8,01,518 टेस्ट घेण्यात आल्या. (हेही वाचा - Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती स्थिर; तब्येतीत सुधार - अभिजीत मुखर्जी)

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. मंगळवारी महाराष्ट्रात 1 हजार 119 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 422 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देश लसीवर संशोधन करत आहेत. रशियाने जगातील सर्वात पहिल्या करोनाविरोधातील लसीची निर्मिती केली आहे. मात्र, यावर अनेक देशांनी आक्षेप घेतला आहे. या लसीची निर्मिती करणारे किरिल दिमित्रेव यांनी भारतातही लसीचं उत्पादन सुरू करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif