Sonipat: दोन महिन्यांपूर्वी प्रेमात लग्न केलेल्या तरुणाची आत्महत्या? तरूणीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप
हरियाणा (Haryana) येथील सोनिपत (Sonipat) जिल्ह्यातील मुरथल गावातील हा सर्व प्रकार घडला आहे.
दोन महिन्यांपूर्वीच प्रेमाच लग्न केलेल्या एका तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेला अवस्थेत आढळला आहे. हरियाणा (Haryana) येथील सोनिपत (Sonipat) जिल्ह्यातील मुरथल गावातील हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. 'आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची तरुणीच्या नातेवाईकांनी हत्या केली आहे', असा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबियांनी केला आहे. तरुणाच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर सहा जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.
नीरज असे या मृत तरुणाचे नाव आहे. नीरज हा अॅमेझॉन कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. नीरजने दोन महिन्यांपूर्वीच गावातल्या एका मुलीशी प्रेम विवाह केला होता. त्यानंतर 20 दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. या भितीने नीरजने मुरथल गावातल्या ओमेक्स सिटीमधील एका प्लॅटमध्ये राहायला गेला. परंतु, लग्नाला दोन महिने पूर्ण होण्याआधीच नीरज राहत असलेल्या फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. परंतु, आपल्या मुलाने आत्महत्या केली असून त्याची हत्या झाली आहे, अशी तक्रार नीजरच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार, नीरजच्या पत्नीच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh: दलित व्यक्तीशी लग्न केल्याच्या रागातून भावांनी गोळी झाडून केली बहिणीची हत्या; शेतात गाढला मृतदेह
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी नीरजच्या पत्नीच्या नातेवाईकांची चौकशी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.