Budget Session 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात सोनिया गांधी यांची रणनीती बैठक, मोदी सरकारला घेरण्याचा निर्णय
अधिवेशन काळात विविध मुद्दे मांडण्यासाठी काँग्रेस इतर समविचारी विरोधी पक्षांसोबत काम करेल, असा निर्णय घेण्यात आला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) पार्श्वभूमीवर आज काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेतील (Rajyasabha) काँग्रेस नेते या या बैठकीत बैठकीत उपस्थित होते. 1 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अधिवेशन काळात विविध मुद्दे मांडण्यासाठी काँग्रेस इतर समविचारी विरोधी पक्षांसोबत काम करेल, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदी सरकारला घेरण्याचा निर्णय घेण्यात आला, चीनच्या सीमेवरील तणाव आणि बदललेली परिस्थिती, कोरोना संकट, एअर इंडिया. या सर्व मुद्यांवर काँग्रेस लोकसभा आणि राज्यसभेत आवाज उठवणार आहे. यासोबतच काँग्रेस संसदेत इतरही काही मुद्दे उपस्थित करणार आहे.
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महासचिव केसी वेणुगोपाल, एके अँटनी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आनंद शर्मा, जयराम रमेश उपस्थित होते. गौरव गोगोई, मनीष तिवारी, के सुरेश आणि संसद सदस्य मणिकम टागोर उपस्थित होते. (हे ही वाचा Budget 2022: ओमिक्रॉनमुळे यावर्षी Halwa Ceremony होणार नाही, 'लॉक-इन' दरम्यान कर्मचार्यांना देण्यात आली मिठाई)
अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता
अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावेळी गदारोळ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या रणनीतीनुसार सरकार आणि विरोधक विविध मुद्द्यांवर आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये समतोल राखला जातो का आणि मागील अधिवेशनाप्रमाणे तृणमूल काँग्रेस काँग्रेसपासून दूर राहते का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन 5 राज्यांच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान होत आहे. त्यामुळे यावरून संसदेतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.