Solar Eclipse 2024: वर्षातील पहिल्या सुर्याग्रहाणाची तारीख आणि महत्व, जाणून घ्या

या ग्रहणाची वेळ भारतीय वेळेनुसार रात्री 9:12 ते दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल रोजी पहाटे 2:22 पर्यंत असेल. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल ज्यामुळे ते पूर्णपणे अंधारात दिसेल. जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एकाच वेळी एकमेकांवरून जातात तेव्हा सूर्यग्रहण होते, जाणून घ्या अधिक माहिती

Solar Eclipse 2023

 Solar Eclipse 2024: 2024 मधील पहिले सूर्यग्रहण सोमवार, ८ एप्रिल रोजी होणार आहे. या ग्रहणाची वेळ भारतीय वेळेनुसार रात्री 9:12 ते दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल रोजी पहाटे 2:22 पर्यंत असेल. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल ज्यामुळे ते पूर्णपणे अंधारात दिसेल. जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एकाच वेळी एकमेकांवरून जातात तेव्हा सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी १२ तास अगोदर सुरू होतो. अशा स्थितीत कोणतेही शुभ कार्य किंवा पूजेशी संबंधित गोष्टी केल्या जात नाहीत. ग्रहण काळात खाणे पिणे देखील प्रतिबंधित आहे. चला तर मग जाणून घेऊया ग्रहण काळात काय करू नये.

सूर्यग्रहणावरील खाण्यापिण्याशी संबंधित समजुती:

सूर्यग्रहणाचे वैज्ञानिक महत्त्व-

जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि या काळात सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. या खगोलीय घटनेला सूर्यग्रहण म्हणतात.

कुठे दिसेल-

हे सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळही भारतात वैध ठरणार नाही. याशिवाय कॅनडा, मेक्सिको, अमेरिका, अरुबा, बर्म्युडा, कॅरिबियन नेदरलँड, कोलंबिया, कोस्टा रिका, क्युबा, डॉमिनिका, ग्रीनलँड, आयर्लंड, आइसलँड, जमैका, नॉर्वे, पनामा, निकाराग्वा, रशिया, या देशांमध्ये हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे. पोर्तो रिको, सेंट मार्टिन., स्पेन, बहामास, युनायटेड किंगडम आणि व्हेनेझुएला यासह जगाच्या काही भागांमधून पाहिले जाऊ शकते.