Rajasthan: जालोर जिल्ह्यात लोबंकळलेल्या विद्यूत ताराच्या संपर्कात आल्याने बसला भीषण आग; 6 प्रवाशांचा मृत्यू

रस्त्यावर विद्युत तार लोबंकळल्याली पाहून चालकाने बस जाग्यावर थांबवली. त्यानंतर कंडक्टरने बसच्या छतावर जाऊन एका काठीच्या सहाय्याने विजेची तार उचलून टाकण्याचा प्रयत्न केला.

Bus Accident in Rajasthan (PC - Twitter)

Rajasthan: राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील (Jalore District) महेशपुरा (Maheshpur) गावात रात्री उशिरा प्रवाशांनी भरलेल्या बसला वीजेच्या तारेचा स्पर्श झाला. करंटमुळे बसमधील 6 जणांचा मृत्यू झाला. ही घटना समजताचं पोलिस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जालोरहून जोधपूर एमडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील महेशपूर गावात भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या दोन बस रस्ता चूकन एका गावात पोहोचल्या. रस्त्यावर विद्युत तार लोबंकळल्याली पाहून चालकाने बस जाग्यावर थांबवली. त्यानंतर कंडक्टरने बसच्या छतावर जाऊन एका काठीच्या सहाय्याने विजेची तार उचलून टाकण्याचा प्रयत्न केला.

यावेळी, खांबावरील विद्युत तार कंडक्टरच्या गळ्यात पडली. ज्यामुळे कंडक्टर आणि बसमध्ये विद्यूत प्रवाह पोहोचला. यात कंडक्टर जागीच जळून खाक झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनाही विद्युत धक्का लागला. त्यामुळे बसला आग लागली. या आगीत दोन बसपैकी एक बस जळून खाक झाली. (वाचा - Dharwad Accident: बेळगाव नजिक धारवाड मध्ये मिनी बस -ट्रकचा भीषण अपघात; 11 जण ठार)

बस कंडक्टर आणि चालकाच्या मृत्यूची पुष्टी -

ही घटना समजताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले. पोलिस प्रशासनाने बस कंडक्टर आणि चालकाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तसेच इतर जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.