Bettiah: नवविवाहितेचे 'हे' धक्कादायक कृत्य पाहिल्यानंतर नवरदेवाची आईदेखील हादरली; पोलिसांनाही पडले अनेक प्रश्न

ही घटना बेतिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Representational Image | (Photo Credits: IANS)

बिहारमधील (Bihar) बेतिया (Bettiah) येथून सर्वांनाच हादरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या सात दिवसानंतर आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. ही घटना बेतिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी बेतिया पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. या हत्यामागील नेमके कारण काय आहे? हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, बेतिया पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे.

श्यामजी साह असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्याम याचे गेल्या रविवारी (13 डिसेंबर) चंपारण येथील गोविंदगंज पोलीस हद्दीतील सरेया गावात लग्न झाले होते. यानंतर नव जोडप आनंदाने आपल्या घरात राहत होते. मात्र आज रविवारी सकाळी जेव्हा श्यामची आई त्याला उठवायला गेली, तेव्हा तो रक्ताळलेल्या अवस्थेत खोलीत जमीनीवर पडलेला तिला दिसला. सासूने हे पाहिल्याचे लक्षात येताच श्यामची पत्नी घरातून पळ काढायचा प्रयत्न करू लागली, तेव्हा कुटुंबीय व गावकऱ्यांनी तिला पकडले. यानंतर श्यामच्या नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी श्यामच्या पत्नीला ताब्यात घेतले. हे देखील वाचा- Hamirpur Rape: धक्कादायक! अल्पवयीन चुलत्याकडून 5 वर्षीय पुतणीवर बलात्कार; उत्तर प्रदेशच्या हमीरपुर येथील घटना

या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवरीने असे धक्कादायक पाऊल का उचलले? असा प्रश्न नवऱ्याच्या कुटुंबियाला पडला आहे. पोलिसही याबाबत तिला प्रश्न विचारल आहेत, मात्र ती काहीही उत्तर देण्यात तयार नाही. पोलिसांना हत्या करण्यासाठी वापरलेले कोणतेही शस्त्रही सापडले नाही, अशी माहिती न्युज18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे.