भर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video
व्ही. एल नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकारपरिषदेमध्ये चप्पल फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे. दिल्लीत भाजप मुख्यालयात भाजपची पत्रकार परिषद सुरू होती,
भाजप (BJP) नेते जी. व्ही. एल नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकारपरिषदेमध्ये चप्पल फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे. दिल्लीत भाजप मुख्यालयात भाजपची पत्रकार परिषद सुरू होती, या दरम्यान नरसिंह राव आणि भूपेंद्र यादव साध्वी प्रज्ञा यांच्याबद्दल बोलत असताना, एका इसमाने राव यांच्यावर चप्पल फेकून मारली. या गोष्टीमुळे सभागृहात एकाच खळबळ माजली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या व्यक्तिला अटक केली आहे, शक्ती भार्गव असे या व्यक्तीचे नाव आहे. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
शक्ती हा कानपूर येथील रहिवासी आहे, त्याने हे कृत्य का केले हे अजून समजू शकले नाही. दरम्यान भाजपने या प्रकारासाठी कॉंग्रेस पक्षाला जबाबदार ठरवले आहे. जीव्हीएल नरसिंहराव हे भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यामुळे या घटनेकडे गंभीरतेने पहिले जात आहे. (हेही वाचा: चोराने भर कोर्टात न्यायमूर्तींवर फेकली चप्पल, आरोपीला सुनावली सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा)
गेल्या वर्षी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक (Naveen Patnaik) बरगढ जिल्ह्यात निवडणुकीच्या बैठकीला संबोधित करताना, एका व्यक्तीने त्यांच्यावर बूट फेकून मारला होता. मात्र हा घाव मुख्यमंत्र्यांना न बसता त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना बसला होता.