Shocking News: प्रेमासाठी वाटेल ते! सीमा हैदर नंतर भारतीय महिलेने केली 'हद्द पार', प्रियकरासाठी पोहोचली पाकिस्तानात

मैत्रीच प्रेमात रुपांतर झालं अन् नंतर प्रियकरला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठलं.

Kiss | representative pic- (photo credit -pixabay

Shocking News: भारतात (India) सीमा  हैदर  (Seema Haidar) आणि सचिन (Sachin) प्रकरण ताजं असताना, भारतातून एक प्रियसी पाकिस्तानात फरार झाली आहे. सीमा प्रियकरांसाठी पाकिस्तानातून भारतात आली,   हे घटना ऐकताच सर्वांचे होश उडाले आहे. सोशल मीडियाच्या प्रेमात अडकलेल्या भारतीय महिला चक्क पाकिस्तानात जाऊन पोहोचली.  राजस्थानची अंजू प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहोचली आहे. भारतातील सीमा हैदर प्रेमप्रकरण  फार चर्चेत रंगलं आहे. भारतातील या प्रकरणांमुळे भारतीय लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

पाकिस्तानी सीमा हैदर भारतात आपल्या चार मुलांसह प्रियकर सचिनकडे पोहोचली.  प्रेमापोटी ग्रेट नोएडाला येथे राहते. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू ही  बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठलं. ही घटना समोर येताच सर्वांचे होश उडाले आहे. अंजू पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात पोहोचली आहे. प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तानातील लाहोर येथे पोहोचली.

पतीला खोटं सागून पाकिस्तान गाठलं

अंजूने पतीला सहलीसाठी बाहेर जात असल्याचे खोटं सांगितले. त्यामुळे पतीला अंजू पाकिस्तानाला पोहोचल्याचे खबर नव्हती. अंजू चार दिवसांपूर्वी सहलीसाठी जयपूरला जाते सांगून घरातून निघाली होती. त्यानंतर ती नक्की कुठे गेली याची माहिती नाही, पण काही दिवसांत ती परत येईल असा विश्वास अंजूच्या पतीने व्यक्त केला. अरविंदच्या म्हणण्यानुसार, अंजू Whatsapp कॉलिंगद्वारे सतत त्याच्या संपर्कात असते. २००७ मध्ये यांच लग्न झालं होतं.  अंजू आणि तिचा पती दोघे ही चांगल्या नोकरीवर असल्याचे समजले आहे.

सोसल मीडियामुळे अंजू पाकिस्तानी मुलाशी तासनतास बोलायची. मैत्रीच प्रेमात रुपांतर झालं. अंजूचा प्रियकर नसरुल्ला खैबर हा पाकिस्तानमधील पख्तूनख्वाच्या दीर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. अंजूने नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानला जायचं ठरवलं. तीनं घरांना खोटं सांगून पाकिस्तान गाठलं. अंजू पाकिस्तानात व्हिटिस व्हिसाच्या साहाय्याने पोहचली आहे. भारतीय महिला पाकिस्तान असल्याची माहिती मिळताच, पाकिस्तानी यंत्रणा सर्तक झाल्याची माहिती समोर आली आहे.



संबंधित बातम्या

Hafiz Abdul Rahman Makki Dies: मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की चा पाकिस्तानमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा दुबईत पराभव, चॅम्पियन्स ट्रॉफीचा 23 फेब्रुवारीला होणार सामना

IND vs AUS, 4th Test Pitch Report And Weather Update: चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज की ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज वर्चस्व गाजवतील? सामन्यापूर्वी, मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून

South Africa vs Pakistan, 1st Test Match Live Streaming In India: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिली कसोटी, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसे लाइव्ह मॅचचा आनंद घेता येणार