Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे पती-पत्नीसह 12 वर्षाच्या मुलीची हत्या
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) शहरातील फाजलगंज येथे शनिवारी पती-पत्नीसह त्यांच्या 12 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तिहेरी हत्याकांडनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) शहरातील फाजलगंज येथे शनिवारी पती-पत्नीसह त्यांच्या 12 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तिहेरी हत्याकांडनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत. या हत्येचे कारण अद्याप समोर आले नसून याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य फाजलगंडच्या उचवा येथे किराणा दुकान चालवत होते. परंतु, आज सकाळी त्यांनी दुकान उघडले नसल्याची माहिती एका व्यक्तीने त्यांच्या नातेवाईकाला दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पत्नी-पत्नीसह त्यांच्या 12 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. त्याचवेळी घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती आणि राजकीय पक्षांचे नेतेही घटनास्थळी पोहोचले आहेत. हे देखील वाचा- Explosion in Cracker Factory: उत्तर प्रदेशच्या कैराना परिसरातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; चौघांचा मृत्यू, अनेकजण जखमी
या तिहेरी हत्याकांडची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिकच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य मोठ्या भावाच्या नावाने घराबाहेर किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2021 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

