Jodhpur Murder: धक्कादायक! पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळच खेळत बसला गेम; राजस्थान येथील घटना

ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमधील (Jodhpur) बीजेएस कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Image used for representational purpose

Husband Kills Wife: श्रुल्लक कारणांवरून आपल्या पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमधील (Jodhpur) बीजेएस कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. आरोपीची पत्नीने शिवण काम करायची, हे त्याला आवडत नसे. यामुळे त्यांच्यात सतत वाद व्हायचा. याच वादातून आरोपीने रविवारी कैची भोसकून पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्यांनीच स्वत: पोलिसांना याबाबत माहिती दिली.

विक्रम सिंह असे आरोपीचे नाव आहे. तर, शिव कंवर मृत महिलेचे नाव आहे. विक्रम आणि शिव कंवर यांच्या लग्नाला 12 वर्ष झाले आहेत. त्यांना दोन मुले असल्याची माहिती मिळत आहे. विक्रमसिंह काहीच कामधंदा करत नव्हता. शिव कंवर ही शिवण घर खर्च चालवत असे. परंतु, विक्रमला तिने शिवण काम केलेले आवडत नसे. यामुळे त्यांच्यात वारंवार वाद व्हायचा. याच वादातून विक्रमने रविवारी शिव कंवर हिची कैची भोकसून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन करून माहिती दिली. तसेच आपल्या सासऱ्याला फोन करून तुमच्या मुलीची हत्या केली आहे, असे सांगितले. घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून मोबाइलवर गेम खेळत होता. हे देखील वाचा- Haryana Rape: अश्लील व्हिडिओ बनवून दोन वर्ष तरूणीवर बलात्कार; 2 जणांना अटक

पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. अटकेनंतर विक्रम सिंह पोलिसांना वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागला. त्याने सांगितले की आम्ही झोपलो आहोत. जेव्हा मी सकाळी उठलो, तेव्हा अचानक माझे मन अस्वस्थ झाले आणि त्यांनी माझ्या पत्नीला कैचीने वार केले. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.