'जय मोदी'मुळे भारताची जगात बेअब्रू; तब्बल 78 कंपन्यांवर जागतिक बँकेकडून बंदी

भारतीय कंपन्यांनी फसवणूक केल्याने जगातील बँकेने भारतीय कंपन्यांवर चक्क बंदी घातली आहे

वर्ल्ड बँक (Photo credit : Gemini Worldwide)

बँक घोटाळे करून देशाबाहेर पळून गेलेल्या चोरांमुळे आख्या जगासमोर भारताची मान खाली गेली. असाच एक लज्जास्पद प्रसंग पुन्हा एकदा भारतावर ओढवला आहे. भारतीय कंपन्यांनी फसवणूक केल्याने जागतीक बँकेने भारतीय कंपन्यांवर चक्क बंदी घातली आहे. जागतीक बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हेल्थ केअर आणि जय मोदी अशा बंदी घातलेल्या कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्या बांगलादेशातील जागतिक बँकेच्या प्रकल्पावर काम करीत होत्या.

या कंपन्यांसोबतच इतर काही कंपन्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार ऑलिव्ह हेल्थ या कंपनीवर तब्बल 10 वर्षे 6 महिने आणि जय मोदीवर 7 वर्षे 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. या दोन कंपन्यांवर सर्वात जास्त कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या कंपन्या –

अँजेलिक इंटरनॅशनल लि. – 4 वर्षे 6 महिने - ही कंपनी नेपाळ आणि इथियोपियामध्ये काम करत होती.

फॅमिली केअर – 4 वर्षे - अर्जेंटिना आणि बांगलादेशमध्ये एका प्रकल्पावर या कंपनीची काम चालू होते.

मधुकॉन प्रोजेक्टस लि. - 2 वर्षे - मधुकॉन भारतात जागतिक बँकेच्याच प्रकल्पावर काम करत होती.

आर.के.डी कन्स्ट्रक्शन लि. – दीड वर्षे

याशिवाय तात्वे ग्लोबल एनव्हायरनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, एसएमईसी (इंडिया) प्रा. लि. आणि मॅकलॉड्स फार्माश्यूटिकल्स लिमिटेड या भारतीय कंपन्यांवर एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

जागतिक बँकेने एकूण 78 कंपन्यांवर बंदी घातली आहे. यापैकी काही कंपन्यांवर किमान 1 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, पाच कंपन्यांना काही अटींवर बंदी घालण्यात आली आहे.

काही कंपन्यांना बँकेकडून कडक अटी घालण्यात आल्या आहेत, जर या कंपन्यांनी जागतिक बँकेच्या अटी पूर्ण केल्या तर त्या पुन्हा जागतिक बँकेबरोबर काम करू शकतील.