Coronavirus: केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणतात 'गो कोरोना गो' ही माझी घोषणा मी जगभर पाहतोय!

20 फेब्रुवारी रोही आठवले यांनी ही घोषणाबाजी केली होती आणि आता भारतभर सर्वजण 'गो कोरोना' म्हणताना दिसून येत आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Photo Credit: ANI)

कविता आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramads Athawale) यांचा एक व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आठवले कॅण्डल मार्चच्या वेळी "गो-कोरोना, गो-कोरोना" (Go Corona) अशी घोषणाबाजी करताना दिसले. आठवले मागील महिन्यात कोरोना व्हायरसबद्दल (Coronavirus) जनजागृती करण्यासाठी कॅण्डल मार्चमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर "गो-कोरोना, गो-कोरोना" असे नारे लगावले. आठवले यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. आठवले यांच्या त्या नाऱ्यावर यूजर्सना आपले हसू अनावर झाले. भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत गेल्यावर 'गो-कोरोना' ची घोषणा सर्वजण करू लागले. 20 फेब्रुवारी रोही आठवले यांनी ही घोषणाबाजी केली होती आणि आता भारतभर सर्वजण 'गो कोरोना' म्हणताना दिसून येत आहे. (Coronavirus: कोरोना व्हायरस हटवण्यासाठी रामदास आठवले यांनी अवलंबला 'हा' अनोखा उपाय Watch Video)

एएनआयशी बोलताना आठवले म्हणाले,"20 फेब्रुवारी रोजी जेव्हा कोविड-19 ची स्थिती भारतात तितकी वाईट नव्हती, तेव्हा मी 'गो कोरोना, कोरोना गो' अशी घोषणा दिली. त्यावेळी लोकं म्हणत होते की यामुळे कोरोना निघून जाईल? आता आम्ही ही घोषणा जगभर पहात आहोत."

दरम्यान, भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4000 पार गेली असून 100 हुन अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. या 4,000 रुगांपैकी 3666 सक्रिय आहेत, तर 292 बरे/सोडण्यात आले/स्थलांतरित झाले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 12 तासात 490 अधिक रुग्नांची नोंद झाली आहे. हा आजार भारतासह जगभर वेगाने पसरत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.