सबरीमाला: केरळ पोलिसांनी 12 वर्षाच्या मुलीचा मंदिर प्रवेश नाकारला
सबरीमाला (Sabarimala) येथील अयप्पा मंदिरात सर्व वयागटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असून देखील 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे.
सबरीमाला (Sabarimala) येथील अयप्पा मंदिरात सर्व वयागटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असून देखील 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या कुटुंबासमवेत मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका मुलीला केरळ पोलिसांनी मंदिरात जाण्यापासून रोखले. एवढेच नव्हे संबधित मुलीकडे तिच्या वयाचे पुरावे दर्शविण्यास सांगितले. मुलीला मंदिरात दर्शनासाठी येऊद्या द्या, असा आग्रह संबधित मुलीच्या परिवाराने त्यावेळी केला. परंतु, पोलिसांनी परिवाराला स्पष्ट नकार देत मुलीला मंदिराबाहेरील जवळच्या एका खोलीत थांबण्यास सांगितले.
एएनआयचे ट्विट-