Indian Railway: भारतीय रेल्वेत 20 रुपयांच्या चहावर 50 रुपयांचा सर्व्हिस टॅक्स; यूजर्स म्हणाले, 'भाऊ रेल्वे काय करत आहे?'

मिळालेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी एक व्यक्ती भोपाळ शताब्दीवरून दिल्लीहून भोपाळला जात होती. त्याने ट्रेनमध्ये चहा घेतला, त्यासाठी त्याच्याकडून 70 रुपये घेण्यात आले. त्यासाठी त्यांना एक बिलही देण्यात आले, ज्यामध्ये चहाची किंमत 20 रुपये आणि उर्वरित 50 रुपये सर्व्हिस चार्ज म्हणून सांगण्यात आले.

Service Tax On Tea (PC - Twitter)

Indian Railway: तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत आहात आणि अचानक तुम्हाला चहाची तल्लफ झाली. तुम्ही ट्रेनमध्ये उपस्थित विक्रेत्याकडून चहाचा कप मागितला आणि त्याचा एक घोटही घेतला. पण विक्रेत्याने हातात बिल टेकवल्यावर त्यावर तुम्हाला 70 रुपये द्यावे लागले तर? आता तुम्ही म्हणाल की, एक कप चहासाठी 70 रुपये कसे देणार? भारतीय रेल्वेच्या भोपाळ शताब्दी एक्स्प्रेसमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीकडून एक कप चहासाठी 70 रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी त्यांना त्याची पावतीही देण्यात आली. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी एक व्यक्ती भोपाळ शताब्दीवरून दिल्लीहून भोपाळला जात होती. त्याने ट्रेनमध्ये चहा घेतला, त्यासाठी त्याच्याकडून 70 रुपये घेण्यात आले. त्यासाठी त्यांना एक बिलही देण्यात आले, ज्यामध्ये चहाची किंमत 20 रुपये आणि उर्वरित 50 रुपये सर्व्हिस चार्ज म्हणून सांगण्यात आले. प्रवाशाने या पावतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर युजर्सनी कमेंट करायला सुरुवात केली. (हेही वाचा - Sister Wrote Long Letter to Convince Brother: भावाची समजूत घालण्यासाठी बहिणीने लिहिले 434 मीटर लांब पत्र; नाराजीचे कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य)

चहाचे बिल सोशल मीडियावर आल्यानंतर यूजर्स सक्रिय झाले. एका यूजरने लिहिले की, '20 रुपयांच्या चहावर 50 रुपये सर्व्हिस चार्ज. त्यामुळे चहाची किंमत 70 रुपये झाली आहे. लुटण्याचा हा सर्वोत्तम मार्ग नाही का?' त्याचवेळी दुसऱ्या युजर्सने म्हटलं आहे की, 'भाऊ रेल्वे काय करत आहे?' तर काहींनी म्हटलं आहे की, एक कप चहावर 50 रुपये सेवा शुल्क खूप जास्त आहे.

रेल्वेने दिलं स्पष्टीकरण -

याप्रकरणी रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. ग्राहकाकडून कोणतेही अतिरिक्त पैसे घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. 2018 च्या भारतीय रेल्वे परिपत्रकाचा संदर्भ देत ते म्हणाले की, जर एखाद्या प्रवाशाने शताब्दी-राजधानी सारख्या गाड्यांमध्ये आरक्षण करताना जेवण बुक केले नाही आणि प्रवासादरम्यान चहा, कॉफी किंवा जेवण इत्यादीची ऑर्डर दिली तर त्याला 50 रुपये सेवा शुल्क द्यावे लागेल.

आता ऑर्डर एका कप चहाची असली तरी प्रवाशाला सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे. याआधी राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये भोजन सेवा अनिवार्य होती. मात्र, नंतर ती ऐच्छिक करण्यात आली. प्रवाशाची इच्छा असल्यास, तो तिकीट बुक करताना ट्रेनमध्ये जेवण आणि अल्पोपहार घेण्यास नकार देऊ शकतो. अशा परिस्थितीत त्याला फक्त तिकिटाचे शुल्क द्यावे लागते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement