RRB NTPC Recruitment 2019: रेल्वेत 35277 पदांसाठी मेगाभरती; जाणून घ्या कसा, कुठे कराल अर्ज?

रेल्वेत मोठी भरती निघाली असून RRB NTPC Recruitment 2019 चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरु झाले असून अर्ज भरण्याची मूदत 12 एप्रिल पर्यंत आहे.

Representational Image (Photo Credits: Youtube/Screengrab)

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रेल्वेत मोठी भरती निघाली असून RRB NTPC Recruitment 2019 चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरु झाले असून अर्ज भरण्याची मूदत 12 एप्रिल पर्यंत आहे. तर अर्जाची फी तुम्ही 5 एप्रिलपर्यंत भरु शकता. मराठी पोरांनो, रेल्वे भरती निघतेय! लक्ष ठेवा, परप्रांतीय घुसतील; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

शिक्षण पात्रता:

10 वी

12 वी

आयटीआय

तसंच संगणकाची माहिती असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क:

General आणि OBC उमेदवारांसाठी- 500 रुपये

एससी, एसटी आणि महिलांसाठी- 250 रुपये

पद:

ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट, अकाऊंट्स, क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनिअर टाईम किपर, ट्रेन्स क्लर्क, कमर्शिअल कम तिकीट क्लर्क, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, स्टेशन मास्टर, इत्यादी.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी या www.rrcer.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.