Uttar Pradesh News: रिसॉर्टचे बांधकाम सुरु असताना छत कोसळला, 2 मजूरांचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना

उत्तर प्रदेशातील बहराईच येथील रेसॉर्टचे बांधकाम करत असताना छत अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Uttar Pradesh Roof Collapse PC TwITTER

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बहराईच येथील रेसॉर्टचे बांधकाम करत असताना छत अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बहराईचच्या ग्रामीण कोतवाली भागात बहराइच सीतापूर महामार्गालगत असलेल्या लेझर रिसॉर्टमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. हेही वाचा- कॅनडामध्ये घराला लागलेल्या आगीत भारतीय वंशाचे जोडपे आणि अल्पवयीन मुलीचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, बांधकाम करत असताना घटनास्थळी आठ मजूर काम करत होते. अचानक बांधलेला छत कोसळला आणि थेट मजूरांच्या डोक्यात पडला. घटनेत काही मजूरांना किरकोळ दुखापत झाली तर दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती प्रशासनांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस आणि एनडीआरएफ दाखल झाले आणि बचाव कार्य सुरु झाले. काही तासानंतर मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींना उपचारासाठी बहराइच मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. बचाव मोहिमेत एसडीआरएफ संघांची मदत आणि अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृत मजूराच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. मजूरांच्या कुटुंबियावर  दुखाचा डोंगर कोसळला.