Rolls Royce-Truck Accident: 9 कोटींची रोल्स रॉईस कार आणि 200 पेक्षा जास्त वेग, नूहमध्ये भीषण रस्ता अपघात, Watch Video
अपघाताच्या वेळी कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू कारमध्ये होते. यात ते गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Rolls Royce-Truck Accident: दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात प्रगत रस्त्यांपैकी एक आहे. त्याचे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच झाले. आता या एक्स्प्रेस वेवर एका भीषण अपघाताची बातमी येत आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, हरियाणातील नूह (Nuh) येथे मंगळवारी रोल्स रॉयस (Rolls Royce) फॅंटम कार तेलाच्या टँकरला धडकली. अपघाताच्या वेळी कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू कारमध्ये होते. यात ते गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास मालू मंगळवारी राजस्थानमधील जयपूर येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. यादरम्यान, त्याच्या रोल्स-रॉईसचा वेग ताशी 200 किलोमीटरच्या वेगापेक्षा जास्त होता. तेवढ्यात तेलाचा टँकर यू-टर्न घेत असताना भरधाव कारने टँकरला धडक दिली. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. मात्र, अपघाताच्या वेळी कार कोण चालवत होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा -Woman Delivers Baby On Road: रुग्णवाहीकेतील इंधन संपले, तेलंगणात महिलेची रस्त्यावरच प्रसुती)
या अपघातात ट्रकमधील दोन जण ठार झाले, तर ट्रकमधील आणखी एक व्यक्ती आणि कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. कुलदीप आणि रामप्रीत अशी मृतांची नावे असून ते उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. या अपघातात विकास, तसबीर आणि दिव्या अशी रोल्स रॉईस कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.