Chaudhary Ajit Singh Passes Away: RLD प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन
वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
Chaudhary Ajit Singh Passes Away: राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह (Chaudhary Ajit Singh) यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मंगळवारी रात्री 86 वर्षीय अजित सिंहची प्रकृती खालावली. त्यांना गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाढत्या फुफ्फुसांच्या संसर्गामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगण्यात येत होते. (वाचा - COVID 19 In India: भारतात मागील 24 तासांत पुन्हा कोरोना रूग्ण 4 लाखांच्या पार; काल आढळले 4,12,262 नवे रूग्ण, 3,980 मृत्यू)
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र चौधरी अजित सिंह बागपत येथून सात वेळा खासदार आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राहिले आहेत. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बागपतसह पश्चिम उत्तर प्रदेशात दु:खाची लाट पसरली आहे. चौधरी अजित सिंह हे जाट समाजातील बड्या शेतकरी नेत्यांमध्ये गणले जात होते. (वाचा -Supreme Court On Oxygen Shortage: मुंबईकडून काहीतरी शिका! दिल्लीच्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सल्ला)
22 एप्रिल रोजी झाला होता कोरोनाला संसर्ग -
22 एप्रिल रोजी आरएलडीचे प्रमुख चौधरी अजित सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून त्याच्या फुफ्फुसातील संसर्ग झपाट्याने वाढत होता. मंगळवारी रात्री अजित सिंहची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चौधरी अजित सिंह यांचा राजकीय प्रवास -
1986 पासून चौधरी अजित सिंह यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यावेळी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आजारी पडले. 1986 मध्ये अजित सिंह यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर 1987 ते 1988 पर्यंत ते लोकदल आणि जनता पक्षाचे अध्यक्षही होते. 1989 मध्ये जनता दलात पक्षाशी विलीन झाल्यानंतर ते सरचिटणीस झाले. 1989 मध्ये अजित सिंह बागपत येथून प्रथमचं लोकसभेत पोहोचले. व्ही.पी. सिंग सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आले.
यानंतर ते 1991 मध्ये बागपत येथून पुन्हा लोकसभेत पोहोचले. यावेळी त्यांना नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. 1996 मध्ये ते तिसऱ्यांदा कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभेवर पोहोचले, पण त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस व पदाचा राजीनामा दिला.
चौधरी अजित सिंह यांनी 2001 ते 2003 या काळात अटलबिहारी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. 2011 से 2014 मध्ये पर्यंत ते मनमोहन सरकारमध्ये मंत्री होते. 2014 मध्ये त्यांनी मुझफ्फरनगर मतदारसंघातून निवडणूक लढविली, परंतु त्यांचा पराभव झाला. 2019 ची निवडणूकही चौधरी अजित सिंह यांनी मुजफ्फरनगरमधून लढविली होती, पण भाजपाचे उमेदवार संजीव बलियान यांनी त्यांचा पराभव केला. तथापि, त्यांच्या पक्षाला शेतकरी आंदोलनाचा फायदा झाला असून