Ghaziabad Boy Beaten For Car Parking: निवृत्त ASI च्या मुलाची विटांनी बेदम मारहाण करून हत्या; कार पार्किंगवरून झाला होता वाद
या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल होत आहे.
Ghaziabad Boy Beaten For Car Parking: दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद (Ghaziabad) मध्ये कार पार्किंगच्या वादातून दिल्ली पोलिसांच्या निवृत्त एएसआयच्या मुलाची वीटाने वार करून हत्या (Murder) करण्यात आली. ही घटना एका हॉटेलबाहेर घडली. घटनेची माहिती मिळताच गाझियाबाद पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल होत आहे.
टीला मोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोपुरा रोडवर असलेल्या बिहारी हॉटेलमध्ये दोन मित्रांसोबत जेवायला गेलेल्या जावळी येथील अरुण उर्फ वरुण या तरुणाचे दुसऱ्या कारमधून आलेल्या दोन तरुणांशी भांडण झाले. प्रत्यक्षात हे भांडण गाडीला लागूनच पार्क केल्यामुळे झाले, त्यात अरुणला दोन तरुणांनी विटांनी बेदम मारहाण केली. अरुणचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. (हेही वाचा - Uttar Pradesh Shocker: किरकोळ वादानंतर पत्नीने केला गळफास घेण्याचा प्रयत्न; बायकोला वाचवण्याऐवजी नवऱ्याने बनवला लाइव्ह व्हिडिओ
तरूणांनी अरुणच्या कारला लागून कार उभी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अरुणच्या गाडीचा दरवाजा उघडता आला नाही. यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद होऊन हाणामारीपर्यंत मजल गेली. दोघांमध्ये झालेल्या भांडणात अरुण गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला उपचारासाठी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शरीरावर झालेल्या जखमा इतक्या गंभीर होत्या की रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी, मृताचे वडील दिल्ली पोलिसातील एएसआय पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी दोन्ही मृतकाचे मित्र आणि काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री 12 वाजेची आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे. गाझियाबादचे अतिरिक्त एसपी सिटी जीके सिंह यांनी सांगितले की, लोणी रोडवरील हॉब्स किचनसमोर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. एका गटाच्या लोकांनी दुसऱ्या गटातील व्यक्तीला वीट मारली. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.