बद्रीनाथ, केदारनाथ चरणी मुकेश अंबानी यांच्याकडून 2 कोटींचे दान
रिलायन्स कंपनीचे (Reliance) मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी बद्रीनाथ (Badrinath) आणि केदारनाथ (Kedarnath) येथे दर्शन घेतले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance) मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी बद्रीनाथ (Badrinath) आणि केदारनाथ (Kedarnath) येथे दर्शन घेतले. त्यावेळी अंबांनी यांनी त्यांच्या चरणी 2 कोटी रुपयांचे दान करण्यात आले आहे. या दोन्ही मंदिरांना प्रत्येकी1-1 कोटी रुपये दान केले आहे.
अंबानी यांनी बद्रीनाथ येथे दर्शन घेतल्यानंतर गीता पठणात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी देशातील जनतेसाठी प्रार्थना केली. तसेच कोटी रुपयांची राशी मंदिर समितीकडे सोपवली. तर दान केलेल्या रक्कमेतून मंदिरात चंदन आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यात येणर आहे.(Lok Sabha Election Results 2019: NDA ची विजयाकडे कूच; शेअर बाजार उसळला, सेन्सेक्स पहिल्यांदा 40,000 च्या पार)
तर धीरुभाई अंबानी यांच्या नावे चंदन खरेदी केले जाणार आहे. तर हे चंदन तमिळनाडू मधील जंगलातून खरेदी करण्यात यावे असी विनंती मुकेश अंबानी यांनी केली आहे. तत्पूर्वी ईशा हिच्या लग्नापूर्वी अंबानी कुटुंबियांनी बद्रीनाथ आणि केदारनाथ येथे दर्शनासाठी उपस्थिती लावली होती.