Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ; इंदूर-भोपाळसह देशातील अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर शंभरी पार
आपण एसएमएसद्वारे दररोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील तपासू शकता. इंडियन ऑईल (आयओसी) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 वर पाठवू शकतात.
Petrol Diesel Price Today: वेगाने वाढणार्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एका दिवसाच्या ब्रेकनंतर आज पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी दोन्ही इंधनांच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर आज विक्रमी उच्चांकावर आहेत. राजस्थानमधील श्रीगंगानगर (103.52), मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळ, रीवा, अनूपपूर आणि महाराष्ट्रातील परभणी येथे पेट्रोल 100 पार केले आहे. दिल्लीत पेट्रोल 24 पैशांनी वाढून 92.58 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेल देखील 27 पैशांनी वाढून 83.22 रुपये प्रति लिटर झाले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर, 10 दिवसांत पेट्रोल 2.21 पैसे आणि डिझेल 2.49 रुपयांनी महागले आहे. (वाचा - Gas Cylinder Weight Complaint: घरी येणार्या गॅस सिलेंडरच्या वजनामध्ये छेडछाड झाल्यास तक्रार कुठे कराल?)
अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होते -
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. जर केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकले गेले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर 27 रुपये असेल, परंतु केंद्र किंवा राज्य सरकार दोघेही हा कर काढून टाकू शकत नाहीत. कारण कमाईचा मोठा भाग येथूनच येतो. या पैशातून विकास होतो.
दररोज सकाळी किंमती निश्चित केल्या जातात
विदेशी विनिमय दराबरोबरचं आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दरही दररोज बदलत असतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेल दरात बदल करतात.
एसएमएसद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या
आपण एसएमएसद्वारे दररोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील तपासू शकता. इंडियन ऑईल (आयओसी) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 वर पाठवू शकतात आणि एचपीसीएल ग्राहक (HPCL) <डीलर कोड> लिहून 9222201122 वर पाठवू शकतात. बीपीसीएल ग्राहक (BPCL) RSP <डीलर कोड> लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)